Prajwal Revanna: भारतात पोहोचताच होणार अटक, प्रज्वल रेवन्ना यांना अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाचा नकार

Karnataka News: अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणारे प्रज्वल रेवन्ना यांना भारतात येताच अटक केली जाणार आहे. कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाचा नकार दिला आहे.
भारतात पोहोचताच होणार अटक, प्रज्वल रेवन्ना यांना अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाचा नकार
Prajwal RevannaSaam Tv

अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवन्ना यांनी भारतात परतण्याआधीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने त्यांना झटका देत अटकपूर्व जमीन देण्यास नकार दिला आहे. दोन दिवसांपूर्वी प्रज्वल यांनी व्हिडिओ स्टेटमेंट जारी करून म्हटले होते की, ते 31 मे रोजी विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर होतील. प्रज्वल यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कर्नाटकचे गृहमंत्री जी.परमेश्वर यांनी प्रज्वल रेवन्ना विमानतळावर पोहोचताच त्याला अटक करण्यात येईल, असे सांगितले होते. परमेश्वर यांच्या वक्तव्यानंतर प्रज्वल यांनी हा अर्ज केला होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना यांनी 30 मे साठी म्युनिक ते बेंगळुरूचे विमान तिकीट बुक केले आहे आणि 31 मे च्या पहाटे ते येथे पोहोचतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भारतात पोहोचताच होणार अटक, प्रज्वल रेवन्ना यांना अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाचा नकार
2019 मध्ये एक्झिट पोलचे अंदाज किती ठरले होते खरे? 2024 ची परिस्थिती आहे वेगळी? राज्यात महायुती की मविआ?

परमेश्वरा यांनी पत्रकारांना सांगितले, "त्याच्या (प्रज्वल) विरोधात वॉरंट जारी करण्यात आल्याने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जातील. त्याला अटक केली जाईल. एसआयटी वाट पाहत आहे. पोलीस त्याला अटक करतील आणि त्याचे स्टेटमेंट घेतील. यानंतर एसआयटीची प्रक्रिया सुरू होईल.''

प्रज्वलला विमानतळावरच अटक केली जाईल का, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी.परमेश्वर यांना विचारले असता ते म्हणाले की, त्याच्याविरुद्ध वॉरंट जारी झाल्याने अटक विमानतळावरच झाली पाहिजे. प्रज्वल हे जेडी (एस) खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आहे. त्यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. हसनमध्ये मतदान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 27 एप्रिल रोजी ते जर्मनीला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

भारतात पोहोचताच होणार अटक, प्रज्वल रेवन्ना यांना अटकपूर्व जामीन देण्यास कोर्टाचा नकार
CM शिंदेंनी संजय राऊतांना पाठवली कायदेशीर नोटीस, माफी न मागितल्यास कारवाईचा इशारा; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पेनड्राइव्ह वाटल्याप्रकरणी एसआयटीने दोन जणांच्या अटकेबाबत विचारले असता परमेश्वरा म्हणाले की, या प्रकरणात जो कोणी सहभागी असेल त्याला अटक केली जाईल. याप्रकरणी 11-12 जणांना अटक करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. हसनमध्ये अनेक पेन ड्राईव्हचे वाटप केल्यानंतर लैंगिक शोषणाचे हे प्रकरण उघडकीस आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com