IAS Dhanendra Kumar Death 
देश विदेश

मोठी दुर्घटना! घरातल्या एसीचा अचानक स्फोट, माजी IAS अधिकाऱ्याचा होरपळून मृत्यू

IAS Dhanendra Kumar Death : जागतिक बँकेचे माजी कार्यकारी संचालक आणि 'CCI' चे पहिले चेअरमन धनेंद्र कुमार यांचा दिल्लीत एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

IAS Dhanendra Kumar dies in AC blast fire at Delhi home : देशाच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. जागतिक बँकेचे (World Bank) माजी कार्यकारी संचालक आणि भारतीय स्पर्धा आयोगाचे (CCI) पहिले अध्यक्ष राहिलेले वरिष्ठ निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी धनेंद्र कुमार यांचा दिल्लीतील राहत्या घरी लागलेल्या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला.

दक्षिण दिल्लीतील हौज खास (Hauz Khas) येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार, घरातील एअर कंडिशनरचा (AC) अचानक भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर लागलेल्या आगीत होरपळून धनेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

बुधवारी रात्री ११:१८ वाजता हौझ खास येथील आर-१५ क्रमांकाच्या घरात आग लागल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल पोलीस स्टेशनला आला. पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. दोन अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

दुर्घटनेवेळी घरात कुटुंबातील सदस्य आणि घरगुती नोकरांसह पाच जण उपस्थित होते. त्यापैकी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्यापैकी एक, ८० वर्षीय धनेंद्र कुमार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलालाही उपचारासाठी दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

प्राथमिक तपासानुसार, एअर कंडिशनरच्या इनडोअर युनिटमध्ये झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली. आग लागली त्यावेळी घरात कुटुंबातील सदस्य आणि घरगुती मदतनीस यांच्यासह एकूण पाच जण उपस्थित होते. पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र यात कोणताही घातपात झाल्याचा संशय नाही.

धनेंद्र कुमार कोण होते?

धनेंद्र कुमार यांचा जन्म १९४६ साली झाला. त्यांनी १९६८ कॅडरचे आयएएस अधिकारी म्हणून आपल्या शासकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणा सरकारमध्ये अनेक वरिष्ठ पदांवर काम केले. केंद्र सरकारमध्ये त्यांनी संरक्षण, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, आणि संस्कृती मंत्रालयांमध्ये सचिव म्हणून काम केले. त्यांनी ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही काम पाहिले.नोव्हेंबर २००५ ते जानेवारी २००९ या काळात त्यांनी जागतिक बँकेचे भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि भूतानसाठी कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी या देशांशी संबंधित विविध आर्थिक आणि विकास प्रकल्पांवर काम केले. फेब्रुवारी २००९ मध्ये त्यांची सीसीआयच्या पहिल्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, हे पद त्यांनी जून २०११ पर्यंत भूषवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

Manoj Jarange: मोठी बातमी! २ तासांच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, मनोज जरांगे उपोषणावर ठाम

SCROLL FOR NEXT