तीन वर्षांपूर्वी निधन झालेले वडील गुगल मॅपवर दिसले Saam Tv
देश विदेश

तीन वर्षांपूर्वी निधन झालेले वडील गुगल मॅपवर दिसले, वाचा नेमकं काय घडलं..

ती गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यू फीचरच्या माध्यमातून आपलं घर पाहात होती. तेव्हा तिला अचानक तिच्या वडिलांचा फोटो दिसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावणे हे अत्यंत दु:खदायक असते. जर ती व्यक्ती आई-वडील (Mother-Father) असेल तर त्याहून मोठं दु:ख नाही. कारण, आई-वडील हे आपल्याला जन्माला घालतात, चालण्यापासून ते बोलण्यापर्यंत आपण आपल्या पायावर उभं राहातपर्यंत ते आपल्यासोबत असतात. त्यांचं संपू्र्ण आय़ुष्य हे मुलांसाठी असते. त्यामुळे जेव्हा ते या जगाचा निरोप घेतात (Death) तेव्हा मागे सोडून जातात त्या त्यांच्या आठवणी. अशा परिस्थितीत जर त्यांच्या हयात असण्याबाबत तुम्हाला कळाले तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. असंच काहीसं इंग्लंडमधील एका महिलेसोबत झालं. - England Woman Saw Her Dads Photo On Google Map After Three Years Of His Death

तीन वर्षांपूर्वी निधन झालेले वडील गुगल मॅपवर दिसले

ही घटना नक्कीच आश्चर्यकारक आहे. इंग्लंडच्या कॉर्नवॉल येथे राहणाऱ्या कारेन (Karen) नावाच्या एका महिलेने जुन महिन्यात एक ट्विट केलं होतं. ज्यानुसार, ती गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यू फीचरच्या माध्यमातून आपलं घर पाहात होती. तेव्हा तिला अचानक त्यांच्या वडिलांचा फोटो दिसला.

पण, त्यांच्या वडिलांचा मृत्यू तीन वर्षांपूर्वीच झाला होता. गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यू फीचरच्या माध्यमातून कारेन जो फोटो पाहात होती तो त्यांच्या वडिलांच्या मृत्यू पूर्वीचा होता. गुगलची ही सेवा जर दिवसाला किंवा महिन्याला अपडेट होत नाही. ती फार काळानंतर अपडेट होते. त्यामुळे जेव्हा कारेनने त्यांचं घर पाहिलं तेव्हा त्यांना वडिलांचा फोटो दिसला. या फोटोमध्ये ते गार्डनिंग करताना दिसत आहेत. त्यांना गार्डनिंग करणे आवडायचे, त्यामुळे जेव्हा कारेन यांनी त्यांचा हा फोटो पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

कारेनला वडिलांच्या चित्राची भेट

कारेन यांच्या या ट्विटला आतापर्यंत 51 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत तर जवळपास 3 हजाराहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. कारेनची ही पोस्ट पाहून अनेकजण भावूक झाले. तसे, कमेंटही या फोटोवर दिसत आहेत. तर एकाने चक्क कारेनला तिच्या वडिलांच्या या फोटोची पेंटिंग काढून पाठवली. त्याच्यामते गुगल मॅप कधी ना कधी अपडेट होईल आणि हा फोटो निघून जाईल पण ही पेंटिंग नेहमी त्यांच्यासोबत राहील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT