Jaipur Car And Truck Accident Saam Tv News
देश विदेश

Jaipur Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! देवदर्शनासाठी जाताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Jaipur Car And Truck Accident: जयपूरमध्ये कार आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते.

Priya More

राजस्थानच्या जयपूरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओव्हरटेकच्या नादात ट्रेलर आणि कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. जयपूरच्या जमवारामगडमध्ये ही घटना घडली. या अपघातामध्ये इंजिनिअर तरुण, त्याची पत्नी, आई-वडील आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. अपघातामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास जमवारामगढ येथील रायसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनोहरपूर-दौसा हायवेवर झाला. भरधाव वेगात असलेल्या कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रेलरखाली कार घुसली.

हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सर्वाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण उत्तर प्रदेशचे होते.

उत्तर प्रदेशमध्ये राहणारा इंजिनिअर तरुण आपल्या कुटुंबाला घेऊन सीकर जिल्ह्यातील खाटू श्यामजी मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होता. पण मंदिरामध्ये पोहण्यापूर्वीच वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातामध्ये इंजिनिअर तरुण अभिषेक वर्मा, त्याची पत्नी, आई-वडील आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. ते नेहमी याच मार्गावरून देवदर्शनासाठी जायचे. पण यावेळी अनर्थ घडला आणि सर्व जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला.

कारला धडकल्यानंतर ट्रेलर उलटला आणि २० फूट खोल दरीत कोसळला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी खूप प्रयत्नांनंतर मृतदेह गाडीतून बाहेर काढला. मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. अपघातामध्ये ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. चालक खड्ड्यात पडलेल्या ट्रेलरमध्ये अडकला. ट्रेलरचे केबिन कापल्यानंतर आणि सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. ट्रेलरचा क्लिनर अपघातामध्ये किरकोळ जखणी झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime : धक्कादायक! अकोल्यात एमडी ड्रग्स तस्करी; आरोपीचं वंचित बहुजन आघाडीचं कनेक्शन उघड

PAN Card: तुम्हीही अजून पॅन कार्ड-आधार कार्डसोबत लिंक केलं नाही? नवा नियम लागू, बसेल मोठा फटका

Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Mumbai Metro: ठाणे ते गेट वे ऑफ इंडिया; आणखी एका मेट्रोचा प्रस्ताव, 13 ठिकाणी असणार स्टॉप

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

SCROLL FOR NEXT