Alibaug Boat Accident : १३० प्रवासी असलेल्या बोटीला छिद्र, पाणी शिरल्याने एकच खळबळ; समुद्रातील मोठी दुर्घटना टळली

Alibaug Boat Accident : अलिबाग जवळच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे. मांडवा जेट्टी शेजारी ही मोठी दुर्घटना टळली आहे. बोटीमध्ये छिद्र पडल्याने त्यात पाणी शिरायला सुरुवात झाली होती.
Alibaug boat accident
Alibaug boat accidentSaam Tv News
Published On

रायगड : रायगड जिल्ह्यातून एक मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे, अलिबाग जवळच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे. मांडवा जेट्टी शेजारी ही मोठी दुर्घटना टळली आहे. बोटीमध्ये छिद्र पडल्याने त्यात पाणी शिरायला सुरुवात झाली होती. त्यावेळी बोटीमध्ये तब्बल १३० प्रवासी होते. मात्र, प्रसंगावधान राखत १३० प्रवाशांना सुरक्षित दुसऱ्या बोटीत हलवण्यात आलं, आणि मोठी दुर्घटना टळली. संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यादरम्यान, मांडवा सागरी पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, अशीच काहीशी घटना काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये घडली होती. रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या साखर जवळ देखील बोट बुडल्याची घटना घडली होती. मात्र यात सुदैवाने सर्व खलाशी बचावले. बोटीत अचानक पाणी भरल्याने ही बोट हळू हळू पाण्यात बुडू लागल्यानंतर या खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. पण ते सुखरूप बचावले.

Alibaug boat accident
धोनी OUT की NOT OUT? तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर वाद पेटला; कोच थेट मैदानात, नेमकं काय घडलं?

अलिबाग तालुक्यातील साखर समुद्रकिनाऱ्यावर मच्छीमारी करण्यासाठी ही बोट गेली होती, याचवेळी बिघाड झाल्याने अचानक गळती लागली व बोट पाण्यात बुडाली. बोटीमध्ये एकूण १५ खलाशी होती. या दुर्घटनेचे साक्षीदार असलेले जनार्दन नाखवा यांनी बोट दुर्घटनेबद्दल माहिती दिली होती. बुडालेल्या बोटीला दुसऱ्या बोटीने समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आले. बोटीमधील सर्व सामान खराब झाले होते. तसेच काही सामान वाहून गेल्याने बोट मालकाचे आणि खलाशांचे सुमारे १२ लाखांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर त्या बोटीतील पाणी काढण्याचे काम पंपाने केलं होतं.

Alibaug boat accident
CSK vs KKR IPL 2025 : घरच्याच मैदानात शिकार झाली! संघाची धुरा सांभाळूनही धोनीचे शेर KKR समोर ढेर; पॉइंट टेबलमध्ये तळाशी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com