terrorists encounter in sunjwan, Jammu Twitter/@ANI
देश विदेश

जम्मू-काश्मीर: पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी एनकाउंटर; २ दहशतवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

Jammu and Kashmir terrorist Encounter: सुंजवान चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुंजवानमध्ये लपलेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जम्मू-काश्मीर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी, जम्मूमध्ये लष्करी आस्थापनेजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली, जी अजूनही सुरू आहे. सुरुवातीच्या गोळीबारात एक सुरक्षा अधिकारी शहीद (Martyr) झाले आणि चार जवान जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत दोन दहशतवादी (terrorist) मारले गेले. जम्मू शहरातील सुंजवान (Sunjwan) कॅन्टोन्मेंट परिसरात पहाटे सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. दहशतवादी शहरात हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Encounter before the Prime Minister Modi's visit; 2 terrorists killed, one army officer martyred)

हे देखील पहा -

जम्मू आणि काश्मीरचे (Jammu And Kashmir) पोलीस प्रमुख दिलबाग सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "सुंजवान चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुंजवानमध्ये लपलेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. सुरक्षा दलांना जास्तीत जास्त जीवितहानी करणे हा त्यांचा उद्देश होता." या चकमकीची माहिती देताना जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली की दहशतवादी येथे लपून काही योजना आखत आहेत. आम्ही रात्रीच्या वेळी परिसराला वेढा घातला. सकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू होता. ज्यामध्ये सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून चार जवान जखमी झाले आहेत. चकमक सुरू आहे."

दुसरीकडे सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी सकाळी सीआयएसएफच्या बसवर हल्ला केला. ज्यामध्ये 15 सैनिक होते. सीआयएसएफने प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना पळून जाण्यास भाग पाडले. या चकमकीत सीआयएसएफचा एक अधिकारी शहीद झाला तर दोन जवान जखमी झाले.

पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी ही चकमक झाली. पंतप्रधान मोदी रविवारी जम्मूला जाणार आहेत. येथे पीएम मोदी एका मोठ्या रॅलीला संबोधित करतील, ज्यात पल्ली गावात हजारो पंचायत सदस्य सहभागी होतील. त्यांच्या दौऱ्याच्या अगोदर येथे हाय अलर्ट ठेवण्यात आला असून सुरक्षा दलांकडून चोवीस तास गस्त घातली जात आहे. कलम 370 आणि 35A द्वारे जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच राजकीय भेट आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT