Shocking Incident Saam
देश विदेश

'सर माझी पाठ दुखतेय' सुट्टीचा मेसेज टाकला अन् १० मिनिटांत कर्मचाऱ्याचा मृत्यू, बॉसची पोस्ट व्हायरल

Shocking Incident: कर्मचाऱ्यानं पाठदुखीमुळे सकाळी बॉसला आजारी रजेचा मेसेज पाठवला. अवघ्या १० मिनिटांनंतर त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

  • कर्मचाऱ्यानं बॉसला Sick Leave साठी मेसेज केला.

  • अवघ्या १० मिनिटांत हृदयविकाराने मृत्यू झाला.

  • मृत कर्मचाऱ्याचं नाव शंकर, वय ४० वर्षे.

  • ही धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली.

आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. याचं जिवंत उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमधून समोर आलं आहे. ४० वर्षीय कर्मचाऱ्यानं बॉसकडे पाठदुखीमुळे सुट्टीची विनंती केली, आणि अवघ्या १० मिनिटांत त्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. बॉसनं त्यानंतर एक ह्रदयद्रावक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नेमकं घडलं काय?

आजारी असल्याकारणानं कर्मचाऱ्यानं त्याच्या बॉसला Sick Leaveसाठी विनंती केली. ४० वर्षाच्या कर्मचाऱ्याच्या पाठीत दुखत असल्यामुळे त्यानं त्याच्या सरांना मेसेज केला. मात्र, त्यानंतर अवघ्या १० मिनिटाच्या आत त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. ही बातमी कळताच बॉसला धक्काच बसला.

यानंतर के.व्ही अय्यर यांनी एक्सवर एक ह्रदयद्रावक पोस्ट शेअर केली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझ्या सहकाऱ्यानं सकाळी ८ वाजेच्या दरम्यान, मेसेज केला होता. पाठदुखीमुळे येऊ शकणार नाही, असं तो म्हणाला. म्हणून त्याला मी, ठीक आहे, आराम कर, असं मी त्याला मेसेज केला'.

'सकाळी ११ वाजता मला एक फोन आला. मला धक्काच बसला. शंकर (कर्मचारी) याचे निधन झाले असल्याचं मला कळवण्यात आलं. सुरूवातीला मला विश्वास बसला नाही. म्हणून मी दुसऱ्या सहकाऱ्याशी संपर्क साधला. शंकरचा पत्ता जाणून घेतला. मी त्याच्या घरी गेलो. तेव्हा कळालं की शंकर आता या जगात नाही',असं अय्यर म्हणाले.

' तो सहा वर्षे माझ्या टीमचा भाग होता. फक्त ४० वर्षांचा होता. तंदुरस्त आणि निरोगी होता. विवाहीत आणि त्याला एक मुलगा होता. त्याला कशाचंही व्यसन नव्हतं', असंही अय्यर म्हणाले. दरम्यान, शंकरच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, के.व्ही अय्यर यांच्या पोस्टवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ थांबवण्यासाठी सरकारची मोठी घोषणा: ‘नसबंदी’ला हिरवा कंदील

Delhi Bomb Blast: भारतातही हमासप्रमाणे हल्ल्याचा कट; उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक, NIAची मोठी कारवाई

Mithila Palkar: कपसाँग गर्ल मिथिला पालकरचा नवा ग्लॅमरस अवतार पाहिलात का?

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज–उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! युतीची पायाभरणी?

आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

SCROLL FOR NEXT