Exit Poll 2023: Saam TV
देश विदेश

Exit Poll 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलची वेळ बदलली; वाचा डिटेल्स

Exit poll 2023 Election Commission Guidelines in Marathi : निवडणूक आयोगाच्या पहिल्या आदेशानुसार, टीव्ही चॅनेल संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल प्रसारित करू शकणार होते.

प्रविण वाकचौरे

Exit Poll EC Guidelines :

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांची मतदान प्रक्रिया आजं संपत आहे. मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल कधी पाहता येतील, याबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार एक्झिट पोलच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या पहिल्या आदेशानुसार, टीव्ही चॅनेल संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल प्रसारित करू शकणार होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र निवडणूक आयोगाने'एक्झिट पोल'बाबत नवी गाईडलाईन जारी केली आहे. आज सायंकाळी 6.30 ऐवजी 5.30 वाजल्यानंतर एक्झिट पोल दाखवता येणार आहे. मतदानानंतर अनेक माध्यमांकडून एक्झिट पोल जाहीर होणार आहेत.

Eklection Commission

मिझोराममध्ये सर्व 40 जागांवर 7 नोव्हेंबरला मतदान झाले होते. छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला 20 जागांवर मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर 17 नोव्हेंबरला मतदान झाले. मध्य प्रदेशातील सर्व 230 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते.

राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबरला 200 जागांवर मतदान झाले आहे. तर आज तेलंगणातील 119 जागांवर मतदान होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT