Election Commission announces deregistration of 334 inactive political parties ahead of Bihar polls. Saam tv
देश विदेश

Election Commission: आरोपानंतर निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर! 334 राजकीय पक्षांना दिला दणका

Election Commission Action On Political Parties: २०२४ साली झालेल्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये साटंलोटं केलं होतं. त्यात मतांची चोरी करून भाजपने विजय मिळवला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. हा वाद सुरू असतानाच निवडणूक आयोगाने देशभरातील ३०० हून अधिक राजकीय पक्षांना दणका दिलाय.

Bharat Jadhav

  • निवडणूक आयोगाने 334 गैरमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली.

  • 2019 नंतर या पक्षांनी एकही निवडणूक लढवली नाही.

  • पक्षांचे कार्यालयांचे पत्ते उपलब्ध नव्हते.

  • बिहार निवडणुकांपूर्वी राजकीय स्वच्छतेसाठी मोठी कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. त्यानंतर निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. आयोगाने आज ३३४ पक्षांना दणका दिला असून ३३४ पक्षांना पक्षांच्या यादीतून हटवण्यात आलंय. या राजकीय पक्षांची RUPP ची नोंदणी रद्द करण्यात आली.या पक्षांनी २०१९ पासून एकही निवडणूक लढवली नव्हती आणि त्यांच्या कार्यालयांचा प्रत्यक्ष पत्ताही सापडला नाहीये. या पक्षांना निवडणूक आयोगाने दणका दिलाय.

या पक्षांनी नोंदणीकृत किंवा नोंदणीकृत नसलेले राजकीय पक्ष म्हणून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण केल्या नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाचे हे पाऊल राजकीय व्यवस्थेच्या स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. RUPP म्हणजे नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष, असे राजकीय पक्ष आहेत जे निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत.

परंतु त्यांना राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर मान्यता मिळालेली नाही. हे पक्ष लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम २९अ अंतर्गत नोंदणीकृत आहेत. नोंदणीनंतर त्यांना कर सवलतीसारखे काही विशेष फायदे मिळतात. देशात एकूण २,८५४ आरयूपीपी होते, त्यापैकी आता निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर २,५२० उरले आहेत.

का कारवाई करण्यात आली?

या पक्षांना यादीमधून हटवणे हा निवडणूक आयोगाच्या व्यापक धोरणाचा भाग आहे. याअंतर्गत केवळ कादोपत्री अस्तित्व असलेल्या आणि प्रत्यक्षात सक्रिय नसलेल्या पक्षांना हटवले जातंय. जून २०२५ मध्ये निवडणूक आयोगाने या मोहिमेची सुरुवात केली होती. आयोगाने ज्या पक्षांवर कारवाई करण्यात आलीय, त्या पक्षांनी २०१९ पासून लोकसभा, राज्य विधानसभा किंवा पोटनिवडणुका लढवल्या नाहीत.

तसेच या पक्षांच्या कार्यालयांचे कोणतेही भौतिक अस्तित्व नसल्याचे आढळून आले. आयोगाने चौकशी केली तेव्हा हे पक्ष केवळ कागदपत्रांपुरते मर्यादित होते. काही आरयूपीपी यापूर्वी आयकर नियम आणि मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले होते.

निवडणूक आयोगाने या पक्षांना डिलिस्टिंग केलंय, म्हणजेच त्यांना नोंदणीकृत यादीत बाहेर काढण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम २९ अ आणि निवडणूक चिन्ह ( आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८ च्या अंतर्गत कोणती नोंदणी केलेले पक्ष जर सतत ६ वर्षांपर्यंत लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सहभागी होत नाहीत, तर त्यांची नोंदणी रद्द केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

Maharashtra Live News Update: डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या निवडणुकीत हाणामारी

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT