Jammu Kashmir Election Date Saam Digital
देश विदेश

Jammu Kashmir Election Date : मोठी बातमी! जम्मू काश्मीरमध्ये १० वर्षानंतर निवडणुका, ३ टप्प्यात मतदान, ४ ऑक्टोबरला मतमोजणी!

Sandeep Gawade

केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर २०१४ नंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होत असून आज निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. जम्मू काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. अमरनाथ यात्रा १९ ऑगस्ट रोजी संपणार आहे, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीची धामधूम सुरु होणार आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली

लोकसभा निवडणूक 2024 ही या वेळची सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. देशभरात निवडणुकीचं पर्व आनंदात साजर झालं. आपल्या लोकसभा निवडणुकीने जगभरात एक चांगला संदेश गेला आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यात आयोगाने दौरा केला. तिथे अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली. सगळ्या राजकीय पक्षांसोबत चर्चा केली, त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती केली. जम्मू काश्मीरमधे लोकसभा निवडणुकीवेळी लोकांनी मोठ्या रांगा लावून मतदान केलं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी बुलेट ऐवजी बॅलेट निवडलं, असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. 2014 मध्ये येथे शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. यावेळी जम्मू काश्मीरमधे 90 जागा आहेत, त्यामधील 74 जागा जनरल आहेत. बाकी जागा आरक्षित आहेत. जम्मू काश्मीरमध्ये एकूण 87.09 लाख मतदार आहेत, 3.71 लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करतील.

निवडणूक आयुक्त काय म्हणाले ?

लोकसभा निवडणूक 2024 ही या वेळची सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. देशभरात निवडणुकीचं पर्व आनंदात साजर झालं. आपल्या लोकसभा निवडणुकीने जगभरात मेसेज गेला. जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यात आयोगाने दौरा केला. तिथे अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली. सगळ्या राजकीय पक्षांसोबत चर्चा केली, त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती केली. जम्मू काश्मीरमधे लोकसभा निवडणुकीवेळी लोकांनी मोठ्या रांगा लावून मतदान केलं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी बुलेट ऐवजी ब्यालेट निवडलं, निवडणुकीचा प्रचार कुठल्याही दहशातिशिवाय झाला पाहिजे, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

Assembly Election 2024 Dates : गेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या ?

जम्मू-कश्मीरमध्ये 2014 विधानसभेल 87 जागांवर मतदान झाले. त्यामध्ये २८ जागांवर पीडीपीला विजय मिळाला. तर भाजपच्या खात्यात २५ जागा होत्या. नॅशनल कॉन्फ्रेंसने 15 जागांवर बाजी मारली होती. तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या होत्या. सात जागांवर अपक्षांनी विजय मिळवला होता.

Assembly Election Date: जम्मू-कश्मीरमध्ये किती विधानसभा जागा?

जम्मू-कश्मीर विधानसभा हा केंद्रशासित प्रदेश आहे. संपूर्ण राज्याचा दर्जा संपल्यानंतर विधानसभेचे चित्र बदलले आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये 90 जागा असतील, ज्यामधील 43 जागा काश्मीर विभागात येतात, तर 47 जागा जम्मू विभागात येतात. याधी ८७ जागांवर मतदान होत होतं, यावेळी ९० जागांवर मतदान होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT