PM Modi  saam tv
देश विदेश

Election Schedule : मोठी बातमी! भाजपची आणखी ताकद वाढणार? राज्यसभेच्या ३ जागांवर निवडणुका जाहीर, पाहा वेळापत्रक

West Bengal Rajya Sabha By-Elections Scheduled : केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या तीन रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २४ जुलै रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Rajya Sabha election schedule : केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील राज्यसभा पोटनिवडणुकीच्या ३ जागांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. मॉन्सून सत्रादरम्यान होणाऱ्या या निवडणुकीमुळे केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या एनडीए (NDA) आघाडीला राज्यसभेत आपले संख्याबळ वाढवण्याची मोठी संधी मिळणार आहे. (West Bengal Rajya Sabha Bypoll Dates Announced: ECI Schedules Voting for Three Vacant Seats on July 24)

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी (TMC) सध्या अंतर्गत बंडखोरीचा सामना करत आहे. सध्याच्या आमदारांच्या संख्याबळानुसार या तिन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीची (BJP) बाजू वरचढ मानली जात आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पश्चिम बंगालमधील या ३ जागांसाठी २४ जुलै रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाईल. १४ जुलै ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर १७ जुलैपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येतील.

जागा का रिकाम्या झाल्या?

तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाच्या सुखेंदु शेखर रे, सुष्मिता देव आणि प्रकाश चिक बरिक या ३ खासदारांनी राजीनामा दिल्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. देव यांचा कार्यकाळ एप्रिल २०३० मध्ये, तर बारिक आणि राय यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२९ मध्ये संपणार होता. पण त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला.

कधी होणार मतदान?:

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या जागांसाठी निवडणुका २७ जुलैपूर्वी होणार आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १४ जुलै असून, १५ जुलै रोजी छाननी होईल. उमेदवार १७ जुलैपर्यंत आपले नामनिर्देशनपत्र मागे घेऊ शकतात आणि २४ जुलै रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदानाच्या दिवशीच सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.

कोण असतील उमेदवार?

सध्या या जागांसाठी अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. या तिन्ही जागा जिंकून भाजप राज्यसभेतील आपले संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत कलह सुरू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी गट उमेदवार उभे करेल की नाही, हे अस्पष्ट आहे.

४ मे रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये टीएमसीने ८० जागा जिंकल्या, तर भाजपने २०७ जागा जिंकल्या. त्यानंतर टीएमसीमध्ये बंडखोरी झाली, ज्यात ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ६० हून अधिक आमदार फुटून बाहेर पडले. मात्र, राज्यसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये हे बंडखोर कोणाला पाठिंबा देतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black rice biryani: काळ्या तांदळाची बिर्याणी कशी बनवावी?

Maharashtra News Live Update: पूरपरिस्थितीत अडकलेल्या आळंदी येथील भाविकांची सुरक्षित सुटका

'माझी आई IAS...' धावत्या कारमधून प्रेयसीला खाली ओढलं, नंतर विटेने मारलं, प्रियकराचं भयंकर कृत्य

Oral cancer treatment: ओरल कॅन्सरवर अल्ट्रासाउंड उपचार शक्य? नवीन संशोधनातून आशादायक निष्कर्ष

No Network In Lift? हे माहित आहे का...? लिफ्टमध्ये मोबाईलचे नेटवर्क गायब का होते?

SCROLL FOR NEXT