Family members mourn the death of a 60-year-old man who allegedly died by suicide following harassment by a local political leader in Rajasthan. Saam Tv
देश विदेश

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Elder Suicide Due To Political Harassment In Rajasthan: राजस्थानमध्ये भाजप नेत्याच्या कथित छळाला कंटाळून ६० वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

भाजप नेत्यासोबत सुरू असलेल्या वादामुळे आणि सततच्या होत असलेल्या त्रासाला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने विष प्राशन केले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील बेडला गावातील रहिवासी भेरू सिंग (६०) यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ३१ मार्च रोजी चौमहाला रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना झालावाड रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस अधिकारी रामकरण कटारिया यांनी सांगितले की, मृत व्यक्तीचा मुलगा, श्याम सिंग याने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत कुटुंबीयांनी असा आरोप केला आहे की, उन्हैल भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष आणि कागडिया येथील रहिवासी असलेल्या सुलतान सिंग यांच्याकडून होणाऱ्या रोजच्या धमक्यांना वैतागून भेरू सिंग यांनी मंगळवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपी सुलतान सिंगने सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्याने फक्त वीजपुरवठा तात्पुरता चालू करण्यास सांगितले होते आणि त्यावेळी कोणताही वाद किंवा भांडण झाले नाही.

शुक्रवारी झालावाडच्या SRG रुग्णालयात मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आणि मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विरोधकांकडून भाजप नेत्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात होतील आश्चर्यकारक ५ बदल

Maharashtra News Live Update: सोलापूर शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रकरणाची व्याप्ती वाढली

RBI Repo Rate : कर्जदारांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने घेतला 'हा' निर्णय; तुमचा EMI कमी होणार की वाढणार?

School Shut Down : शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारा अहवाल! ९२,००० शाळांना टाळं; कारणे आली समोर

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT