USA Green Sky South Dakota News Saam TV
देश विदेश

Video : निळं आकाश अचानक हिरवं झालं; निसर्गाच्या चमत्काराने नागरिकांमध्ये भीती

Eerie South Dakota green-sky : साउथ डकोटा राज्यातील काही भागात 160 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साउथ डकोटा, अमेरिका: निसर्गापुढे मानव प्राणी हा एखाद्या सुक्ष्मजीवाप्रमाणे आहे. निसर्ग जेवढा सुंदर आहे तेवढाच तो रहस्यमयी देखील आहे. अनेकदा निसर्गाच्या (Nature) किमयेपुढे माणसाची बुद्धीही चालत नाही. अमेरिकेतील (USA) नागरिकांना असाच प्रत्यय आला आहे. अमेरिकेच्या साउथ डकोटा येथे निळंशार असणारं आकाश (Sky) काही क्षणातचं अचानक हिरवं झालं त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुमारे 400 किलोमीटरपर्यंतच्या आकाशाने अचानक हिरवा रंग धारण केल्याने निसर्गाच्या या किमयेची जगात सर्वत्र चर्चा होतेय. (USA Green Sky South Dakota News)

हे देखील पाहा -

160 किमी प्रतितास वेगाने वारे

साउथ डकोटा राज्यातील काही भागात 160 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे दिसून आले. वादळापूर्वी आकाशाचा हिरवा रंग ही एक विलक्षण घटना असल्याचे म्हटले जात आहे. साऊथ डकोटा वाहतूक विभागाच्या कॅमेऱ्यांमध्येही ही घटना कैद झाली आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हवामान शास्त्रज्ञ पीटर रॉजर्स म्हणाले की, वादळाकडे लोकांचे लक्ष वेधले गेले कारण आकाश हिरवे झाले होते आणि हा रंग देखील स्वतःमध्ये खूप खास आहे. येत्या काळातही आकाशाचा हा हिरवा रंग चर्चेचा विषय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. रॉजर्स म्हणाले की वादळाच्या वेळी आकाशाचा रंग असामान्यपणे बदलतो. सूर्यप्रकाश कसा आहे आणि वातावरणात विविध घटक कसे विखुरले जातात यावर रंग अवलंबून असतो. हे अतिशय विलक्षण आहे. कधी आकाशाचा रंग जांभळा तर कधी पूर्णपणे काळा असू शकतो.

मुसळधार पावसाच्या दरम्यान किंवा वादळाच्या दरम्यान आकाशाचा हिरवा रंग सूचित करतो की काही वेळाने गारा देखील पडू शकतात. पण प्रत्येक वेळी आकाशाचा रंग केवळ हवामानातील बदल सांगेल, ते शक्य नाही. सुमारे 45 मिनिटे 160 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्याने अनेक ठिकाणी परिस्थिती कठीण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT