मोदी सरकारचा मोठा निर्णय; खाद्यतेलाच्या किमती स्वस्त होणार  Saam Tv
देश विदेश

मोदी सरकारचा मोठा निर्णय; खाद्यतेलाच्या किमती स्वस्त होणार

सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमती रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय मिशन सुरू करण्यास मान्यता दिली आहे. ज्यामुळे खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत.

Anuradha Dhawade

मोदी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. खाद्यतेलाच्या किंमती रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय मिशन (National Mission) सुरू करण्यास मान्यता दिली आहे. खाद्यतेलाच्या (Edible oil) आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने 11,040 कोटी रुपयांचे राष्ट्रीय मिशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्यतेलांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी खाद्यतेल-तेल पाम (NMEO-OP) वरील 11,040 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मोहिमेला मंजुरी दिली.

हे देखील पहा-

सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमती कमी होणार आहेत. सामान्य जनतेच्या खिशाची काळजी घेत केंद्र सरकारने सोया तेल आणि सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क निम्म्याने कमी केले आहे. यामुळे येत्या काळात खाद्यतेलाच्या किंमती खाली येऊ शकतात. काही दिवसांपूर्वी सरकारने पाम तेलाचे आयात शुल्क कमी केले होते.

सरकारने सूर्यफूल आणि सोया तेलावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 7.5 टक्के केले आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्कही कमी केले होते. म्हणजेच, सर्व करांसह ड्यूटी कपात 8.25 टक्के झाली आहे.

सरकारने सोया तेल आणि सूर्यफूल तेलाचे आयात शुल्क कमी केले आहे. ते 15 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे परदेशातून खाद्यतेल आयात करणे स्वस्त होईल. सध्या एका वर्षात भारत सरकार 60,000 ते 70,000 कोटी रुपये खर्च करून 15 दशलक्ष टन खाद्यतेल खरेदी करते. कारण देशांतर्गत उत्पादन सुमारे 70-80 लाख टन आहे. तर देशाला त्याच्या लोकसंख्येसाठी दरवर्षी सुमारे 25 दशलक्ष टन खाद्यतेलाची गरज असते. भारताने गेल्या वर्षी मलेशिया आणि इंडोनेशियामधून 7.2 दशलक्ष टन पाम तेल आयात केले. ब्राझील आणि अर्जेंटिनामधून 34 लाख टन सोयाबीन तेल आणि रशिया आणि युक्रेनमधून 2.5 मिलियन टन सूर्यफूल तेल आयात केले गेले. मलेशिया आणि इंडोनेशिया या दोन्ही देशांमधून पाम तेल भारतात आयात केले जाते. मागणी आणि पुरवठ्याच्या या दरीमुळे देशांतर्गत बाजारात किंमतीवर परिणाम होतो.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

SCROLL FOR NEXT