Corona Vaccine: आता येणार तीन डोस वाली कोरोना लस; केंद्राची मंजुरी

आता कोरोना महामारी विरोधात देशात सुरू असलेल्या लसीकरणात मोहिमेत आणखी एक लस जोडली गेली आहे. केंद्र सरकारकडून फार्मा कंपनी झायडस कॅडिलाच्या 3-डोस कोरोना लसीला मंजुरी दिली आहे.
Corona Vaccine: आता येणार तीन डोस वाली कोरोना लस; केंद्राची मंजुरी
Corona Vaccine: आता येणार तीन डोस वाली कोरोना लस; केंद्राची मंजुरीSaam Tv
Published On

नवी दिल्ली: आता कोरोना महामारी Corona विरोधात देशात सुरू असलेल्या लसीकरणात मोहिमेत आणखी एक लस जोडली गेली आहे. केंद्र सरकारकडून फार्मा कंपनी झायडस कॅडिलाच्या 3-डोस कोरोना लसीला मंजुरी दिली आहे. या लसीचे नाव ZyCov-D आहे. भारतीय औषध नियंत्रक जनरलच्या Drug Controller General of India तज्ज्ञ समितीने शुक्रवारी या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे. तसेच फार्मा कंपनीकडून या लसीच्या 2 डोसच्या परिणामाबाबत समितीने अतिरिक्त डेटाही मागितला आहे.

हे देखील पहा-

जेनेरिक फार्मास्युटिकल कंपनी कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने 1 जुलै रोजी ZyCoV-D च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगीसाठी अर्ज केला होता. ही चाचणी 28 हजार स्वयंसेवकांवर घेण्यात आली होती. लसीचा परिणामकारकता दर 66.6 टक्के असल्याचे सांगण्यात झाले आहे. असेही म्हटले गेले आहे की ही लस 12 ते 18 वयोगटासाठी देखील पूर्णपणे सुरक्षित आहे.

Corona Vaccine: आता येणार तीन डोस वाली कोरोना लस; केंद्राची मंजुरी
दहशतीच्या जोरावर उभं राहिलेलं साम्राज्य फार काळ टिकत नाही- नरेंद्र मोदी

Covishield, Covaccine, Sputnik, Moderna. आता झायडस लस जोडल्याने आत्तापर्यंत लसींची संख्या पाच पर्यंत होणार आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com