दहशतीच्या जोरावर उभं राहिलेलं साम्राज्य फार काळ टिकत नाही- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुजरातमधील सोमनाथ मंदिराशी संबंधित कार्यक्रमात भाग घेतला होता. या दरम्यान, मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे विश्वास चिरडला जाऊ शकत नाही.
दहशतीच्या जोरावर उभं राहिलेलं साम्राज्य फार काळ टिकत नाही- नरेंद्र मोदी
दहशतीच्या जोरावर उभं राहिलेलं साम्राज्य फार काळ टिकत नाही- नरेंद्र मोदीSaam Tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी शुक्रवारी गुजरातमधील Gujrat सोमनाथ मंदिराशी संबंधित कार्यक्रमात भाग घेतला होता. या दरम्यान, पीएम मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे विश्वास चिरडला जाऊ शकत नाही. ज्यांनी दहशतीच्या आधारावर साम्राज्य उभे केले त्यांचे अस्तित्व कायमचे नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे विधान अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीबद्दल वक्तव्य केल्याचे म्हणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अभिभाषणात म्हणाले आहेत की, 'दहशतवादामुळे विश्वास ठेचला जाऊ शकत नाही. सोमनाथ मंदिर अनेक वेळा पाडण्यात आले, त्याला लक्ष्य करण्यात आले. पण प्रत्येक वेळी हे मंदिर उभे राहते आणि तेव्हा आणि ते जगासाठी सर्वात मोठे उदाहरण असते.

पीएम मोदी पुढे आपल्या भाषणात म्हणाले, 'जे शक्तींचा नाश करत आहेत, जे दहशतवादाच्या आधारावर साम्राज्य उभारण्याचा विचार करत आहेत, ते काही काळासाठी आपले वर्चस्व गाजवू शकतात, परंतु त्यांचे अस्तित्व कधीही कायमचे नसते, ते अधिक मानवता करू शकत नाहीत.

दहशतीच्या जोरावर उभं राहिलेलं साम्राज्य फार काळ टिकत नाही- नरेंद्र मोदी
Lionel Messi: मेस्सीने अश्रू पुसलेल्या त्या टिश्यूची किंमत झाली करोडो रुपये!

भारत wait and watch या मोडमध्ये;
भारत अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीच्या येण्याबाबत भारत सरकारकडून आजपर्यंत कोणतेही कायमस्वरूपी विधान देण्यात आलेले नाही. भारत सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. आणि भारताचे संपूर्ण लक्ष तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यावर आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com