ED Arrest TMC MLA x
देश विदेश

ED Raid : ईडीने धाड टाकली, आमदार भिंतीवरून उडी मारून पळाला

ED Arrest MLA : एका गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीने तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांना अटक केली आहे. निवासस्थानी छापेमारी सुरु असताना साहा यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

Yash Shirke

  • शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने तृणमूल काँग्रेस आमदार जीवन कृष्णा साहा यांना अटक केली.

  • छापेमारीदरम्यान साहा यांनी भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईल फोन नाल्यात फेकले.

  • ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत कारवाई करत साहा यांना ताब्यात घेतले.

ED Arrest TMC MLA : शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीसंदर्भात ईडीने तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांना अटक केले आहे. भरती घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात छापे टाकल्याने ईडीनेही कारवाई केली. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निवासस्थानाची झडती घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने साहा यांना ताब्यात घेतले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी सुरु असताना आमदार जीवन कृष्णा साहा यांनी भिंतीवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. साहा यांनी त्यांचे फोन घरामागील नाल्यात फेकून दिले. उरलेले फोन अधिकाऱ्यांनी जप्त केले. छाप्याच्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये आमदार भिजलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळाले.

भिंतीवरुन उडी मारण्याच्या प्रयत्नात आमदार जीवन कृष्णा साहा खाली पडले. घाण, कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या जवळून ईडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी साहा यांना घेऊन गेले. एजन्सीला सहकार्य न केल्याबद्दल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. साहा यांच्या काही नातेवाईकांच्या आणि सहकाऱ्यांच्या जागांवरही छापे टाकण्यात आले.

२०२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण बुरोने घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपांखाली साहा यांनी अटक केली होती. काही काळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. ईडीचा मनी लाँड्रिंग खटला हा सीबीआयने नोंदवलेल्या त्या एफआयआरवर आधारित आहे, ज्यात कोलकाता उच्च न्यायालयाने गट 'क' आणि 'ड' कर्मचारी तसेच इयत्ता ९वी ते १२ वीचे सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या भरतीतील कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT