ईडीने आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्या ७.४४ कोटींची मालमत्ता जप्त केली.
ईडीची कारवाई मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत करण्यात आली.
जप्तीची एकूण रक्कम आता १२.२५ कोटींवर पोहोचली असून तपास सुरू आहे.
ED Raid News : अंमलबजावणी संचालनायल म्हणजेच ईडीने दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र कुमार जैन यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. जैन यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपन्यांमधील ७.४४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मागील काही वर्षांपासून सत्येंद्र कुमार जैन हे ईडीच्या रडारवर होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने ३१ मार्च २०२२ रोजी सत्येंद्र कुमार जैन यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांच्या ४.८१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली होती. २७ जुलै २०२२ रोजी पीसी दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने २९ जुलै २०२२ रोजी पीसीची दखल घेतली. ईडीने जैन यांच्या नियंत्रणाखाली असलेल्लाय कंपन्यांमधील ७.४४ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ही कारवाई १५ सप्टेंबर रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत करण्यात आली होती.
२४ ऑगस्ट रोजी ईडीकडून सीबीआयच्या एका प्रकरणात सत्येंद्र कुमार जैन, त्यांची पत्नी पूनम जैन आणि अन्य काही जणांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली. सत्येंद्र कुमार जैन यांनी दिल्ली सरकारमध्ये मंत्री असताना १४ फेब्रुवारी २०१५ ते ३१ मे २०१७ या कालावधीत बेहिशेबी मालमत्ता जमवली होती. ३ डिसेंबर २०१८ रोजी यासंदर्भात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
तपासानंतर, ईडीने ३१ मार्च २०२२ रोजी सत्येंद्र कुमार यांच्या मालकीतील मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आणि २७ जुलै २०२२ रोजी खटला दाखल केला. न्यायालयाने २९ जुलै २०२२ रोजी तक्रारीची दखल घेतली. १५ सप्टेंबरच्या कारवाईनंतर, नवीनतम कारवाईसह, जप्तीची एकूण रक्कम आता १२.२५ कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे म्हटले जात आहे.
आयकर विभाग आणि दिल्ली उच्च न्यायालयाने अंकुश जैन आणि वैभव जैन हे दोघे सत्येंद्र जैन यांचे बेनामी धारक असल्याचे घोषित केले. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांच्या एसएलपी आणि पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या. यामुळे हा निर्णय अंतिम झाला. पीएमएलएच्या कलम ६६ (२) अंतर्गत ही माहिती सीबीआयला देण्यात आली होती. याआधारे, सीबीआयने पुढील तपास केला आणि पूरक आरोपपत्र दाखल केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.