Punjab CM bhagwant singh mann  Saam tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू व्यक्तीवर ईडीचा छापा, नोटांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, राजकारणात खळबळ

Bhagwant Mann Latest News : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निकटवर्तीयांवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात छापेमारीदरम्यान नोटांनी भरलेल्या बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.

Namdeo Kumbhar

ED raid on Bhagwant Mann associate : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री मान याचे ओएसडीच्या विश्वासूवर आज ईडीने अचानक धाड टाकली. मनी लाँडरिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने ३ ठिकाणी छापेमारी केली असून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वेस्टर्न टॉवर्सवरील छाप्यादरम्यान ईडीने २० लाख रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅग जप्त केल्या आहेत. या बॅग इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली फेकण्यात आल्या होत्या.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ओएसडीच्या निकटवर्तीयांच्या मालकीच्या एसएएस नगर आणि चंदीगड येथील तीन ठिकाणी गुरूवारी ईडीने छापेमारी केली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीकडून पंजाबमध्ये शोधमोहीम राबवली जात आहे. खरारमधील वेस्टर्न टॉवर्स या सोसायटीमध्ये आज ईडी अचानक पोहचली. या छाप्यात ईडीने आतापर्यंत २० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात ईडीकडून अद्याप तपास आणि चौकशी केली जात आहे.

खरारजवळील छज्जू माजरा येथील वेस्टर्न टॉवर्समधील फ्लॅट क्रमांक ९०६ चा दरवाजा गुरूवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ठोठावला. ईडी दाखल झाल्याचे समजताच प्लॅटमधील लोकांनी २ बॅगा नवव्या मजल्यावरून खाली फेकल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ त्या बॅगा ताब्यात घेतल्या आणि घटनास्थळी पसरलेल्या नोटांचे बंडल गोळा केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

सनटेक सिटी प्रकल्पाच्या संबंधात ईडीने मोहाली आणि चंदीगडमधील १२ ठिकाणी आज शोधमोहीम राबवली आहे. अजय सेहगल, एबीएस टाउनशिप्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲटलस बिल्डर्स, धीर कन्स्ट्रक्शन्स आणि त्यांच्या साथीदारांवर जीएमएडीए (GMADA) कडून सीएलयू (CLU) परवाने मिळवण्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. यामध्ये त्यांनी लोकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणात ईडीने आज पंजाबमध्ये १२ ठिकाणी छापेमारी केली.

जीएमएडीए शुल्क न भरलेल्या बिल्डरांना मदत केल्याचा आणि राजकीय आश्रय दिल्याचा आरोप नितीन गोहल यांच्यावर करण्यात आला आहे. आज गोहल यांच्या निवासस्थानी ईडी शोधमोहीम राबवत लाखो रूपये जप्त केले आहेत. नितीन गोहल हे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे ओएसडी राजबीर घुमन यांचे विश्वासू सहकारी आहेत. नितीन गोहल हे पंजाब सीएमओसाठी संपर्क अधिकारी म्हणून काम करत असल्याचाही संशय आहे. आता ईडीने या प्रकरणाची कारवाई करत भगवंत मान यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रभर 'एफडीए'चा कारवाईचा धडका; 3 दिवसांत 2.11 कोटींचा गुटखा जप्त, 16 जण अटकेत

कौटुंबिक वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपयांत होणार; 'डेडलाईन' फॉर्म्युलाही ठरला, मोजणीचे नवे दर जाहीर

Yavatmal Farmer Issue: शेतकऱ्याला 50 लाखांचं 'चंदन', नशिबाचा झाला खेळ; पैसे परत करण्याची वेळ

उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं; ३ खासदार दिल्लीत, २ नॉट रिचेबल, उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटणार?

PNG-CNG Price Hike: महागाईचा स्फोट! CNG तिसऱ्यांदा महागला, PNG प्रति किलो 51.50 रुपयांवर

SCROLL FOR NEXT