kerala politics  Saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीची धाड; कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या, राजकारण तापलं

kerala politics : केरळमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. त्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्याची बाब समोर आली आहे.

Vishal Gangurde

केरळमध्ये राजकीय वातावरण तापलं

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीने टाकली धाड

ईडीने धाड टाकल्यानंतर घराबाहेर मोठा गोंधळ

केरळमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. केरळमध्ये माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या घरावर ईडीने धाड टाकली. ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर डावे, माकप (CPM) कार्यकर्ते आक्रमक झाले. या कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांन्या गाड्या फोडल्या. ही संपूर्ण घटना तिरुवनंतपुरममध्ये घडली. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

केरळमध्ये ईडी अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते पिनाराई विजयन आमि माजी मंत्री, आमदार मोहम्मद रियास यांच्या घरावर धाड टाकली. या कारवाई संतापलेल्या आंदोलकांनी रस्ता अडवला. कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्याच्या वाहनांच्या काचा फोडल्या. तिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या बेकरी जंक्शन येथील पिनाराई विजयन यांच्या घरासमोर पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी अधिकाऱ्यांनी कन्नूर येथील पिनाराई विजयन यांच्या निवासस्थानी आणि कोझिकोडच्या कोट्टुली येथील मोहम्मद रियास यांच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर कोझिकोडमध्ये पोलीस सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर काही नेत्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ईडीची शोधमोहीम जवळपास आठ तास चालली.

ईडीने केरळमधील कंपनी सीएमआरएल म्हणजे कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड या कंपनीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई केली. या प्रकरणात माजी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी धाड टाकली. ईडीच्या पथकाने जवळपास केरळच्या कन्नूर, एर्नाकुलम, तिरुवनंतपुरम आणि बेंगळुरू सहित १० जागांवर शोध घेतला. कंपनीने खर्चात फेरफार दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरण हे २०१९ साली उघडकीस आलं. आयकर विभागाने आधी सीएमआरएलवर छापा टाकला होता. त्यावेळी १३० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झालं होतं. तपासानंतर हे प्रकरण एसएफआयओ विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कांदा, साखर प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा- सुनेत्रा पवार

हार्बर मार्गावरून लवकरच धावणार जलद लोकल; कसा असेल संपूर्ण प्रकल्प? महत्त्वाची माहिती समोर

प्रसिद्ध दिग्दर्शकानं घराच्या छतावरून उडी मारून जीवन संपवलं; पोलिसांना सापडली सुसाईड नोट

High Blood Pressure: औषधांशिवाय BP कंट्रोल करायचाय? आजच सोडा या 3 धोकादायक सवयी

Cancer : पुरुषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, 'या' लक्षणांकडून दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल

SCROLL FOR NEXT