Rana Kapoor saam tv
देश विदेश

प्रियांका गांधींनी २ कोटींचे पेंटिंग विकत घ्यायला लावलं; राणा कपूर यांचा ED कडे जबाब

Rana Kapoor on Priyanka Gandhi: प्रियंका गांधी यांच्याकडे असलेली पेटिंग खरेदी करण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांनी आपल्यावर दबाव टाकला असल्याचं राणा कपूर यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर(Rana Kapoor) यांनी ईडीच्या चौकशीदरम्यान एक खळबळजनक दावा केला आहे. राणा यांनी ईडीला दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे की, काँग्रेसच्या नेत्यांनी (Congress leaders) माझ्यावर दबाव टाकत प्रियांका गांधी वड्रा (Priyana Gandhi) यांच्याकडून एमएफ हुसैन यांची पेंटिंग खरेदी करण्यास भाग पाडलं आणि त्या मोबदल्यात मला 'पद्मभूषण' देण्याचं आश्वासन दिलं. त्यानुसार मी प्रियंका गांधी यांच्याकडून दोन कोटी रुपयांमध्ये पेंटिंग खरेदी केली. पुढे याच पैशातून सोनिया गांधी यांचा उपचार करण्यात आल्याचा दावाही कपूर यांनी केला आहे. (ED chargesheet Rana Kapoor Claims Priyanka Gandhi Was Forced To Buy Hussains Painting)

राणा कपूर यांनी ईडीला यापूर्वीच ही माहिती दिली होती. २०२० मध्ये त्यांनी ईडीकडे याबाबत जबाबही नोंदविला होता. या जबाबाचा काही भाग आता समोर आला आहे. आपल्या जबाबात राणा कपूर म्हणतात की, कॉंग्रेसचे तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा (Murali Devda) यांनीच त्यांना व्यवहार करण्यास भाग पाडलं होतं. जर पेटिंग खरेदी करण्यास नकार दिला तर गांधी कुटुंबासोबतचे त्यांचे संबंध बिडतील आणि पद्मभूषण पुरस्कार सुद्धा हातातून जाईल, असा इशाराही मुरली देवरा यांनी आपल्याला दिला असल्याचा जबाब त्यांनी ईडीला दिला आहे.

रक्कमेतून सोनिया गांधींचा केला उपचार

ईडीला दिलेल्या जबाबात राणा कपूर यांनी दावा केला आहे की, त्यांनी मुरली देवरा यांच्या सांगण्यावरून प्रियंका गांधी यांच्याकडून २ कोटी रुपयांमध्ये पेंटिंग खरेदी केली. त्यानंतर मुरली देवरा यांचा मुलगा मिलिंद देवरा यांनी मला फोन केला आणि पेंटिंगमधून मिळालेला धनादेश गांधी परिवार सोनिया गांधी यांच्या न्यूयॉर्कमधील उपचारांसाठी वापरणार असल्याची माहिती दिली. इतकंच नाही तर, त्यावेळी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांनी फोन करत आपले आभार मानले असल्याचंही कपूर यांनी म्हटलं आहे.

राणा कपूर हे मार्च २०२० पासून न्यायालयीन कोठडीत आहे. शनिवारी ईडीने राणा कपूर यांच्याविरोधात मुंबईतील पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात राणा कपूर यांनी दिलेल्या जबाबाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT