Iran's President Ibrahim Raisi died in a Helicopter Crash Saam TV
देश विदेश

Iranian President Helicopter Crash: मोठी बातमी! इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

Iranian President Ebrahim Raisi's Latest News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्र्यांचाही मृत्यू झाला आहे. इराणी माध्यमांनी हा दावा केला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्र्यांचाही मृत्यू झाला आहे. इराणी माध्यमांनी हा दावा केला आहे. हेलिकॉप्टरचा ढाचा देखील आढळल्याचे समोर आले आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरचा रविवारी हेलिकॉप्टर अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमध्ये इब्राहिम रईसी, परराष्ट्र मंत्री आणि इतर अधिकारी होते.

इराणचे रेड क्रिसेंटच्या प्रमुखांनी सांगितलं की, रेस्क्यू टीम दुर्घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या ढाच्याजवळ पोहोचली आहे. आम्हाला रेस्क्यू टीमकडून काही व्हिडिओ मिळाले आहेत. हेलिकॉप्टर जळून खाक झाले आहे. घटनास्थळावर कोणी जिवंत असल्याचे आढळून आलेले नाही. इराणच्या माध्यमांचा दावा आहे की, हेलिकॉप्टर दुर्घटनास्थळी कोणतीही व्यक्ती जीवंत आढळलेले नाही.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हे अजरबैजान प्रातांत जात होते.इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत परराष्ट्र मंत्री, अजरबैजान प्रांताचे गवर्नर,इतर अधिकारी आणि अंगरक्षक प्रवास करत होते.

हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष रईसी आणि अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वात सरकार असताना मागच्या महिन्यात इस्रायलने ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला होता. या घटनेनंतर उलटसुलट चर्चा सुरु असून इस्त्रायलवर संशय व्यक्त केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

इराणचे राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. पंतप्रधान मोदी एक्स पोस्ट करत म्हणाले की, 'इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या निधनाने दु:खी आहे. भारत आणि इराणमधील दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यास त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांच्या कुटुंब आणि इराणमधील लोकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या दु:खद प्रसंगी भारत इराणच्यासोबत उभा आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

SCROLL FOR NEXT