Earthquake SaamtV
देश विदेश

Earthquake In Bangladesh : भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरला! लडाखपर्यंत जाणवले धक्के

Earthquake In Bangladesh : भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ते भारतातील लडाखपर्यंत जाणवले. मात्र, भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

प्रविण वाकचौरे

Earthquake In Bangladesh :

बांगलादेशात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. शनिवारी सकाळी 9.05 च्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. भूंकप विज्ञान केंद्रानुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.6 नोंदवण्यात आली.

भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की ते भारतातील लडाखपर्यंत जाणवले. मात्र, भूकंपामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भूकंपाचं केंद्र कोमिल्लाच्या दक्षिण आणि नैऋत्येस 48 किमी आहे. आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यामुळे उत्तर बंगालमध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. उत्तर बंगाल जिल्ह्यांपैकी दक्षिण दिनाजपूर, अलीपुरद्वार येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

याआधी 8 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वारला भूकंपाचा धक्का बसला होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.6 इतकी होती.

दुसरीकडे लडाखही हादरला आहे. लडाखमध्ये शनिवारी सकाळी 8.25 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.4 इतकी आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 10 किमी खाली होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंबोलीमधील दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढण्यात रेस्कू टीमला यश

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT