Weather Alert: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
imd issues rainfall alert in maharashtra kerala tamil nadu  for next 24 hours check weather update
imd issues rainfall alert in maharashtra kerala tamil nadu for next 24 hours check weather update Saam TV
Published On

Maharashtra Weather Alert:

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहेत. महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला आहे. गारपीटीमुळे शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

imd issues rainfall alert in maharashtra kerala tamil nadu  for next 24 hours check weather update
ED Officer Arrested: कारवाई टाळण्यासाठी मागितली ५० लाखांची लाच; ईडीचा अधिकारी रंगेहाथ पकडला, पाहा VIDEO

अवकाळीचं संकट कधी दूर होणार? याची वाट शेतकरी पाहत आहे. अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यात आज पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता आहे. २ ते ४ डिसेंबरपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळू शकतो, असं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

मुंबई, पुणे कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील काही दिवस वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभावही कायम राहणार आहे. यामुळे पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी होईल आणि लगतच्या मैदानी प्रदेशात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, चंदीगड, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूतील चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होणयाची शक्यता आहे. ३ आणि ४ डिसेंबरला आंध्र प्रदेशात दक्षिण किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

imd issues rainfall alert in maharashtra kerala tamil nadu  for next 24 hours check weather update
Maharashtra Politics: अजितदादांच्या आरोपानंतर शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक; आज मोठा गौप्यस्फोट करणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com