Earthquake in  Saam tV
देश विदेश

Earthquake News : अरुणाचल प्रदेश भल्या पहाटे हादरला, पश्चिम कामेंग परिसरात 3.7 रिश्टर स्केलचे धक्के

Earthquake in Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम कामेंगमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री हे भूकंपाचे धक्के जाणवले.

प्रविण वाकचौरे

Earthquake in Arunachal Pradesh :

अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची घटना समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशमधील पश्चिम कामेंगमध्ये बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री हे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे 1 वाजून 49 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशमध्ये काही तासांच्या अंतराने भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिल धक्का पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी जाणवला. तर दोन तासांनंतर अरुणाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. पहाटे ३.४० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.४ एवढी होती. या भूकंपाच्या केंद्राची खोली 5 किमी होती. (Latest News Update)

मराठवाड्यातही भूकंपाचे धक्के

नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. गुरुवार सकाळी सव्वासहाच्या दरम्यान हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रत ४.२ एवढी मोजली गेली आहे. भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

भूकंप कसा होतो?

पृथ्वीच्या भूगर्भात सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, घासतात, एकमेकांवर चढतात किंवा त्यांच्यापासून दूर जातात तेव्हा जमीन थरथरू लागते. यावेळी भूकंपाचे धक्के जाणवतात. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. हे प्रमाण 1 ते 9 पर्यंत आहे, ज्यामध्ये 1 सर्वात कमी तीव्रतेची धक्का दर्शवते आणि 9 सर्वात जास्त तीव्रतेचा धक्का दर्शवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Maharashtra Live News Update : मुंबईमध्ये आलिशान कारला भीषण अपघात, एक जण गंभीर जखमी

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT