Earthquake In Karnataka
Earthquake In Karnataka saam tv
देश विदेश

Earthquake In Karnataka : कर्नाटकात भूकंप; घाबरुन घराबाहेर पडले नागरिक

साम न्यूज नेटवर्क

बंगळूर : कर्नाटक (karnatak) राज्यातील हसन (hassan) जिल्हा आणि नजीकच्या परिसरात आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप (earthquake) झाला. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यास दुजाेरा दिला आहे. (Earthquake In Karnataka)

आज पहाटेच्या सुमारास कोडागु जिल्ह्यातील सोमवरपेट जवळील गावांत भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोक घाबरुन घरा बाहेर पडले. कर्नाटक राज्य आपत्ती प्राधिकरणाचे आयुक्त मनोज राजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा तालुक्यातील नागरनहल्ली ग्रामपंचायत अंतर्गत मालुगनहल्ली गाव होता. या भूकंपाचे धक्के 40-50 किलाेमीटरच्या त्रिज्यापर्यंत जाणवले, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान या भूकंपामुळे स्थानिक लोकांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली असण्याची शक्यता त्याची अद्याप अधिकृती माहिती प्राप्त नाही असेही अधिका-यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT