May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Rashi Bhavishya May 2024: बुध हा ग्रहांचा सेनापती आहे. जो सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे. येत्या शुक्रवारी बुध मंगळाच्या राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे 12 राशी प्रभावित होतील.
May Horoscope 2024
May Horoscope 2024Saam Tv

May Horoscope 2024:

बुध हा ग्रहांचा सेनापती आहे. जो सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे. येत्या शुक्रवारी बुध मंगळाच्या राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे 12 राशी प्रभावित होतील. 10 मे रोजी बुधाचे संक्रमण होताच सूर्य आणि शुक्रासोबत बुधाचा संयोग होईल. 30 मे पर्यंत बुध मेष राशीत राहील. चला जाणून घेऊया मेष राशीत बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो...

कर्क

बुध राशीतील हा बदल कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अनेक चांगले गुंतवणूकदार मिळू शकतात. लव्ह लाईफमध्ये काही चढ-उतार येतील, जे चर्चेने सोडवता येतील. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक कामे मिळू शकतात, ज्यामुळे तुमच्या वाढीस मदत होऊ शकते.

May Horoscope 2024
Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

धनु

मेष राशीत बुधाचे संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देणारे आहे. तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. तब्येतीत काही चढ-उतार होतील. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनाही काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह फिरायला देखील जाऊ शकता. आर्थिक स्थितीही चांगली राहील.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी बुधाची चाल शुभ ठरू शकते. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळेल. समाजात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच या कालावधीत तुम्हाला अनेक नवीन गुंतवणूक पर्याय मिळू शकतात.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com