Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya Today 8 May 2024: आजचे राशिभविष्य, ८ मे २०२४ : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
Horoscope
Rashi Bhavishya Today 8 May 2024Saam TV

दैनिक पंचांग ८ मे २०२४

वार - बुधवार नक्षत्र - भरणी योग - सौभाग्य करण - नाग रास - मेष १९/०७ प. नंतर वृषभ . दिनविशेष - अमावस्या वर्ज्य

मेष : उत्साह चांगला राहील

मला काय हवंय त्यासाठी प्रयत्न कराल. आणि त्याचे यश मिळेल. प्रसिद्धी लाभेल. उत्साह चांगला राहील. समजूतदारपणाने काम कराल.

वृषभ : महत्त्वाची काम शक्यतो टाळा

कौटुंबिक चिंता, मानसिक ताण हे त्रास हो. महत्त्वाची काम शक्यतो आज करूच नका. वस्तू हरवू शकतात. कुठे अति पैसा खर्च होणार नाही ना? याकडे लक्ष ठेवा आणि त्याची दक्षता घ्या.

मिथुन : काही परिचय आज होतील

आपल्याला कायमच लोकांच्यात ऊठबस आवडते. गप्पा मारायला आवडतात. काही नवीन परिचय आज होतील आणि त्याचा फायदा भविष्यामध्ये निश्चित होईल.

कर्क : मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार

खेकड्यासारख्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत खऱ्या. त्यामुळे राजकारणी बाणा पण आहे. वर जाणाऱ्याला खाली तुम्हाला सहज ओढता येते. पण या क्षेत्रात सहभागी होताना मान सन्मान आणि प्रतिष्ठा आज वाढणार आहे हे नक्की.

सिंह : गुरुची कृपा आज राहील

"आपलीच तत्व त्यात मी मस्त" अशा गोष्टी तुमच्या आहेत. त्यात भर विशेष गुरुची कृपा आज राहील. काय आहे आयुष्य याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.

कन्या : आज वादविवाद टाळा

कशाला उगाच चिंता करायची आणि द्विधा मनस्थितीत राहायचे? खरंतर आज वादविवाद टाळा. कुणाच्या सहकाऱ्याची अपेक्षा न ठेवता, आपण भले आणि आपले काम भले या तत्त्वाने वागा बघा दिवस चांगला जाईल.

Horoscope
Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

तूळ : दिवस खूप छान जाणार

संसाराचा राम रगाडा पेलवतही नाही आणि सोडताही येत नाही. मात्र आज ह्यामध्ये वेगळेपण म्हणजे जोडीदाराशी समजून घेऊन वागलात तर दिवस खूप छान जाणार आहे.

वृश्चिक : बेतानेच वागायला लागेल

नोकर मंडळी कर्मचारी यांच्याशी बेतानेच वागायला लागेल. विनाकारण "सय आणि व्यय" या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ ठेवलात तर दिवस चांगला आहे.

धनु : छान कल्पना मनामध्ये येतील

"प्यार मे बडे बेआबरू होके निकले" असा आजचा दिवस आहे .खूप छान प्रणय कल्पना मनामध्ये येतील. आणि गुलाबी दिवस आजचा राहील.

मकर : नक्कीच संधीच सोन कराल

तसेही आपल्याला पैसा, प्रॉपर्टी, काम या गोष्टी आवडीच्याआहेत. म्हणून यासाठी नवीन प्रस्ताव आले तर नक्कीच संधीच सोन कराल.

कुंभ : आज तारांबळ उडेल

कामासाठी प्रवास आणि प्रवासासाठी काम. अशा दोन गोष्टींचा मिलाप साधताना आज तारांबळ उडेल. पण दिवसाचा शेवटी काहीतरी छान आपण केलं याचे समाधान असेल.

मीन : पुढच्या कामाला लागा

जुनी देणी कोणाला दिली असती तर ती येण्याचा आजचा दिवस आहे. पैसा आल्याने टिकत नाही- तर टिकवल्याने टिकतो. हे लक्षात ठेवा आणि पुढच्या कामाला लागा.

Horoscope
Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com