Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya Today 7 May 2024: आजचे राशिभविष्य, ७ मे २०२४: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य
Rashi Bhavishya Today 7th May 2024
Rashi Bhavishya Today 7th May 2024Saam Tv

दैनिक पंचाग दिनांक ७ मे २०२४

वार - मंगळवार, तिथी - कृ.चतुर्दशी ११/४१ प . नंतर अमावस्या (दर्श अमावस्या) नक्षत्र - अश्विनी योग - आयुष्यमान करण - शकुनी रास - मेष दिनविशेष - चतुर्दशी वर्ज्य

मेष : दिवस आनंदाने जाणार

आपल्या राशी स्वभावा प्रमाणे उगाचच चिडचिड आज होणार नाही. बुद्धी आणि मन या दोघांचा समतोल साधा. दिवस आनंदाने जाणार. आपणही आनंदी होऊन इतरांना सुध्दा आनंदी ठेवू शकतो हे जाणवेल.

वृषभ : मानसिक चिंता वाढतील

खर्चावर नियंत्रण ठेवा. उगाचच कुठेतरी खरेदीला जावे असे वाटेल. उगाचच काहीतरी खावे प्यावे असे वाटेल. पण त्यामधून आनंद पदरात नाही पडणार तर मानसिक चिंता वाढतील.

मिथुन : जुन्या मित्रांच्या भेटी होतील

आजचा दिवस खूप छान. लाभाचा दिवस आहे. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. सहवासाचा आनंद काय असतो या गोष्टी जाणवतील. केलेल्या गोष्टींचे श्रेय मिळण्याचा आजचा दिवस.

कर्क : व्यवहारात जपून पावले टाका

व्यवहारात जपून पावले टाका. मानसन्मानांच्या गोष्टीचा आज सासेमिरा मागे लागेल. आपण इतरांना काही दिले तर आपल्याला मिळते हे आज जाणवेल.

सिंह : धर्माविषयी प्रेम उफाळून येईल

धर्माविषयी प्रेम उफाळून येईल. मुळामध्येच काही गोष्टीत काटेकोरपणे आपल्याला राहायची सवय आहे. याच गोष्टी इतरांना सांगून "लकडी शिवाय मकडी वळत नाही" हे पटवून द्या.

कन्या : सावधगिरीने कामे करा

भ्रष्टाचार लाचलुचपत विनाकारण असणाऱ्या पैशाचा मोह आज त्रासदायक ठरू शकतो. आणि म्हणूनच सावधगिरीने कामे करा.

Rashi Bhavishya Today 7th May 2024
Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

तूळ : पती पत्नीसाठी सौख्याचा दिवस

पती पत्नीसाठी सौख्याचा दिवस. मजेत आणि आनंदात काही गोष्टी घडतील. हलका दिवस असल्याने मनाला पक्षांच्या पिसासारखे हलके वाटले.

वृश्चिक : तब्येतीकडे विशेष लक्ष द्या

काय करावे आणि काय करू नये हे आधी मनाने ठरवा आणि मगच त्या गोष्टी करा. अविचाराने घेतलेले निर्णय त्रासदायक ठरतील. तब्येतीकडे विशेष लक्ष द्या.

धनु : व्यवहार स्वच्छ व पारदर्शक ठेवा

व्यवहार स्वच्छ व पारदर्शक ठेवा. चुकीच्या गोष्टी विनाकारण आज घडणार नाहीत ना याकडे लक्ष ठेवा. संस्कार व जडणघडण यासाठी मुलांवर लक्ष केंद्रित करा.

मकर : कष्ट अधिक नफा कमी

पशु प्राणी यांबद्दल विशेष आस्था आज जाणवेल. त्यांची सेवा करण्याचा आजचा दिवस मनात आले तर संधी घालवू नका. पाहुण्याची सरबराई मध्ये दिवस व्यस्त राहील. शेतीच्या कामात कष्ट अधिक नफा कमी.

कुंभ : कामात यश मिळेलच

काय करावे आणि काय करू नये? या संधिग्नता मध्ये दिवस असणार आहे. कारण कामाच्या अनेक वाटा आज एकाच पायघडीवर दिसतील. पण योग्य ते निवडाल आणि यश मिळेलच.

मीन : साक्षीदार राहू नका

साधेपणामुळे उगाचच कोणत्याही व्यवहाराला बळी पडण्याचा आज दिवस. साक्षीदार राहू नका. साक्ष देऊ नका. सल्ला ऐका सल्ला देऊ नका.

Rashi Bhavishya Today 7th May 2024
Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com