TVS Iqube EV:
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS पेट्रोल आणि EV दोन्ही सेगमेंटमध्ये स्कूटर ऑफर करते. TVS Iqube EV ही कंपनीच्या इलेक्ट्रिक इंजिनमधील एक स्मार्ट स्कूटर आहे. ही स्कूटर 1.47 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
यात अलॉय व्हील्स आणि सिंपल हँडलबार देण्यात आलं आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर या स्कूटरची 2024 या आर्थिक वर्षात एकूण 1.89 लाख युनिट्सची विक्री झाली. तर 2023 च्या याच कालावधीत Iqube EV ची 96654 युनिट्सची विक्री झाली होती.
TVS Iqube EV जानेवारी 2020 मध्ये लॉन्च करण्यात आली हे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 100 किलोमीटरपर्यंत रेंज देते. याची सीटची उंची 770 मिमी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर 5 तासांत पूर्णपणे चार्ज होते.
2020 : 62 (जानेवारी ते मार्च)
2021 : 1061
2023 : 96654
2024 : 1.89 लाख
ही स्कूटर फक्त 4 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडते. या TVS स्कूटरमध्ये 32 लिटरची अंडरसिट स्टोरेज क्षमता आहे. यात टेलिस्कोपिक फॉर्क्स सस्पेंशन देण्यात आले आहेत. स्कूटरमध्ये 12 इंची अलॉय व्हील आहेत. याचे पॉवरफुल इंजिन 3000 W पॉवर देते.
TVS Iqube EV दोन प्रकारांमध्ये आणि सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात समोरच्या टायरवर डिस्क ब्रेक आणि मागील टायरवर ड्रम ब्रेक आहे. या स्टायलिश स्कूटरमध्ये U आकाराचा LED DRL आहे. स्कूटरमध्ये मोठा फूटबोर्ड, लगेज हुक, यूएसबी चार्जिंग सॉकेट यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. स्कूटर 2.25kWh आणि 4.4kW च्या दोन बॅटरी पॅकसह येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.