Delhi Earthquake Saam Tv
देश विदेश

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

earthquake shocks in delhi ncr: दिल्लीपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान होता. या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून ते घराबाहेर पळाले.

Priya More

Summary -

  • उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले

  • दिल्ली-एनसीआरमध्ये नागरिक घाबरून बाहेर पडले

  • अफगाणिस्तानमध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप

  • कोणतीही मोठी हानी झाल्याची माहिती नाही

भूकंपाच्या धक्क्याने उत्तर भारत हादरला. दिल्ली-एनसीआर, जम्मू आणि काश्मीर आणि चंदीगडसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक आलेल्या दोन धक्क्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही नागरिक घाबरले. नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नोएडातील ऑफिसमध्ये असलेले कर्मचाऱ्यांना बाहेर पडावे लागले. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान होता.

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर, पूंछ आणि काश्मीर खोऱ्यांमधील इतर भागातही हे भूकंपाचे धक्के जाणवले. काही सेकंद भूकंपाने जमीन हादरली. दिल्ली आणि एनसीआरमधील अनेक उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले. कार्यालय आणि घरामध्ये असलेले नागरीक तात्काळ घराबाहेर पडले. काही मोकळ्या जागेत तर काही उद्यानांमध्ये जाऊन उभे राहिले.

भूकंपाच्या धक्क्यामुळे दिल्लीसह इतर कोणत्याही ठिकाणी नुकसान झाले नाही तसंच जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. प्रशासन या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून जाऊ नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.

या भूकंपाच्या धक्क्यानंतर घरातील वस्तू, फर्निचर, पंखे, झुंबर हालत होते. याचे अनेक व्हिडीओ समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर भूकंपाचे धक्के जाणवत असताना त्यांना आलेले अनुभव देखील सांगितले. दरम्यान, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती प्रदेशात होता. अफगाणिस्तानमध्ये ५.९ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यावर्षी दिल्ली-एनसीआरमध्ये झालेला हा तिसरा भूकंप आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT