Earthquake SAAM TV
देश विदेश

Earthquake in MP: मध्य प्रदेशमधील जमीन थरथरली; ४.० रिश्टर स्केल भूकंपाचे झटके जाणवले

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, ग्वालियरमध्ये या भूकंपाचा केंद्र होता.

साम टिव्ही ब्युरो

Earthquake News: सध्या विविध राज्यांमध्ये भूकंपाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भूकंपाच्या धक्क्यांनी मध्य प्रदेशही दाहरून गेला आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर शहरात आज (शुक्रवारी) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी १०.३१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच या भूकंपाची तिव्रता ४ रिश्टर स्केल असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, ग्वालियरमध्ये या भूकंपाचा केंद्र होता. येथे २८ किलोमीटर दूर आणि १० किलोमीटर खोल अंतरावर भूकंपाचा केंद्र असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या कंपनीने म्हटलं आहे. सकाळी १०.३९ मिनिटांनी छत्तीसगडच्या अंबिकापूरपासून ते आसपासच्या अन्य शहरात देखील भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्र सुरजपूरमधील भटगांव येथे आहे.

फ्रँक होगरबीट्स यांची भविष्यवाणी चर्चेत

दरम्यान भूकंपाच्या या घटनांध्ये फ्रँक होगरबीट्स यांनी केलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. डच संशोधक फ्रँक होगरबीट्स यांनी तुर्की आणि सीरियासारखा भूकंप भारतात होणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर दिल्लीत भूकंपाचे झटके जाणवले तसेच नंतर मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरात देखील भूकंपाचे झटके जाणवलेत.

भूकंप आल्यास घ्या ही काळजी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप आल्यावर सर्वात आधी स्वत:च्या सुरक्षेकडे लक्ष द्या.

भूकंप आल्यावर जर तुम्ही घरात असाल तर एखाद्या मदबूत वस्तूला पकडून ठेवा. जर तशी कोणतीही जड वस्तू आजूबाजूला नसेल तर फरशीवर पायांवर वाकून उभे रहा.

भूकंप आल्यावर शक्यतो मोकळ्या जागेची निवड करा. आरसा, खिडक्या किंवा भींती भूकंपामुळे कोसळू शकतात. त्यामुळे मोकळ्या जगी येऊन उभे रहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

SCROLL FOR NEXT