Earthquake In Delhi 
देश विदेश

Delhi Earthquake : राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली, भल्या पहाटे नागरिकांची धावपळ

Earthquake In Delhi : राजधानी दिल्लीमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. साखर झोपेत लोक असताना भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भीतीचे वातावरण होते. या भूकंपामुळे नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.

Namdeo Kumbhar

Delhi Earthquake Today : सोमवारी सकाळी सकाळी राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली आहे. लोक साखरझोपेत असताना अचानक भूकंप झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. भूकंपाचे झटके इतके मोठे होते की नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण होते. लोक घराबाहेर आले होते. भूकंपाचे केंद्रबिंदु दिल्ली असल्याचे समोर आलेय. दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे तीव्र हादरे बसले.

सोमवारी (17 फेब्रुवारी) सकाळ सकाळी राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपाचे हे हादरले इतके वेगवान होते की नागरिक घाबरून घराबाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र दिल्लीत होते. या भूकंपाची तीव्रता ४ रेश्टर स्केल इतकी होती. दिल्लीसह आजूबाजूच्या परिसरातही भूकंपाचे तीव्र हादरे बसले आहेत.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजता नवी दिल्लीमध्ये ४ रेश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के इतकी तीव्र होते की इमारती, घरे काही काळासाठी थरथर कापत होते. त्यामुळे घाबरून लोक घराबाहेर पडले. राष्ट्रीय भूकंप केंद्राच्या मते, दिल्लीमधील या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र नवी दिल्लीतील जमिनीपासून पाच किलोमीटर अंतरावर होते. अनेक सेकंद भूकंपामुळे पृथ्वी हादरली. साखर झोपेत झोपलेल्या लोकांनीही घराबाहेर जाणं पसंत केले.

दिल्लीमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत कोणत्याही नुकसानीचे वृत्त नाही. सकाळी साडेपाच वाजता नवी दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम यांच्यासह आजूबाजूच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप इतका तीव्र होता की इमारती अन् घरातील सामानाचीही मोठ्या प्रमाणात हालचाल झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

EPFO : पगाराची मर्यादा २५ हजारांपर्यंत होण्याची शक्यता, १ कोटी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Success Story: दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास; दोनदा UPSC क्रॅक; IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले; मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

Monday Horoscope: या ६ राशींचं श्री गणेश करतील कल्याण; सोमवार ठरेल आनंदाचा दिवस

SCROLL FOR NEXT