jonathan sperm donor
jonathan sperm donor twitter
देश विदेश

Father Of 500 Childs: अबब! वयाच्या ४१ व्या वर्षीच बनला ६०० मुलांचा बाप; आता कोर्टानेही म्हटलं बस करा..

Ankush Dhavre

Ireland Sperm Donor: जगात काय घडेल याचा काही नेम नसतो. चक्क न्यायालयाने एका व्यक्तीच्या बाबतीत आगळा वेगळा निर्णय दिल्याचे पाहायला मिळाले आहे. नेदरलँडच्या न्यायालयात जोनाथन नावाच्या व्यक्तीवर मुलांना जन्म घालण्यावर बंदी घातली गेली आहे.

जर त्याने मुलं जन्माला घातली तर त्याच्यावर ९० लाख इतका दंड आकाराला जाईल. ऐकायला जरा वेगळं वाटतंय ना? मात्र हे खरं आहे.

जोनाथन नावाचा हा व्यक्ती शुक्राणू दाता आहे. त्याने आतापर्यंत जगभरात ५०० ते ६०० मुलांना जन्म दिला आहे. जोनाथन मेजरच्या शुक्राणूपासून आतापर्यंत 500-600 मुले जन्माला आली आहेत. त्याने ज्या ज्या ठिकाणी शुक्राणू दिले आहेत. त्यांना चिट्ठी लिहून ते शुक्राणू नष्ट करण्यात यावे असे आदेश आता कोर्टाने जोनाथनला दिले आहेत. केवळ ज्या पालकांनी शुक्राणूंची प्री बुकिंग केली आहे. त्यांना वगळता इतर सर्व शुक्राणू नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जोनाथनच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं, मात्र तेव्हाच एका नागरी संस्थेने न्यायालयात केस दाखल केली आणि जोनाथनच्या सुखी आयुष्यातील अडचणीत वाढ झाली. (latest news updates)

यापूर्वीच नेदरलँडमध्ये स्पर्म डोनेट करण्यावर लावण्यात आली होती बंदी..

जोनाथन गेल्या काही वर्षांपासूनच मोठ्या प्रमाणावर शुक्राणू दान करतोय. जोनाथन २०१७ मध्ये देखील चर्चेत आला होता. त्यावेळी नेदरलँडमधील फर्टिलिटी सेंटरमध्ये त्याला शुक्राणु दान करण्यावर बंदी आणली गेली होती.

यापूर्वीच त्याच्या शुक्राणूंचा वापर करून १०० मुलांना जन्म दिला गेला होता. नेदरलँडमध्ये बंदी आणल्यानंतर त्याने बाहेरील देशांमध्ये शुक्राणू दान करायला सुरुवात केली.

यासाठी त्याने डॅनीश स्पर्म बँक क्रायओसची निवड केली. क्रायोसच्या शाखा जगभर पसरलेल्या आहेत. त्याने क्रायोसला शुक्राणू दान करायला सुरुवात केली. त्यानंतर जोनाथन जगभरातील अनेक मुलांचा पिता बनला. जोनाथनने आपले शुक्राणू विकण्यासाठी अनेक वेळा आपले नाव बदलले. त्यासाठी तो नेहमी वेगळे पैसे घेत असे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT