Viral News: दुसऱ्या मुलीसोबत नाचताना पाहून बायकोची सटकली, भररस्त्यातच नवऱ्याची केली धुलाई, Video पाहून पोटधरुन हसाल

Latest News: सध्या या व्हिडिओवर (Viral Video) नेटिझन्स मजेशीर कमेंट्स करत आहेत.
Viral Video
Viral VideoSaam Tv

Trending News: पती-पत्नीचं (Husband-Wife) नातं हे खूपच भारी असतं. या नात्यात कधी रुसवे, तर कधी फुगवे असतात. पण कधी-कधी या नवरा बायकोची भांडणं अशी होतात की घरातील भांडणं थेट रस्त्यावर देखील पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बायको नवऱ्याची भर रस्त्यात धुलाई करते. सध्या या व्हिडिओवर (Viral Video) नेटिझन्स मजेशीर कमेंट्स करत आहेत.

Viral Video
IPL Fans Fight VIDEO Viral: खुर्च्या फेकल्या, लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; दिल्ली-हैदराबाद LIVE सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये तुफान हाणामारी

नवरा-बायकोच्या प्रेमाचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहत असतात. बऱ्याचदा त्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ देखील समोर येतात. ते पाहून आपल्याला हसू आवरता येत नाही. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक सुंदर तरुणी पांढऱ्या रंगाचा हॉट ड्रेस घालून डान्स करत आहे. रस्त्याच्या मध्यभागी ही तरुणी डान्स करत असून आजूबाजूला मोठ्यासंख्येने लोकं तिला पाहण्यासाठी उभे राहिले आहेत. हे सर्वजण आपआपल्या मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत.

Viral Video
Viral Video: हौस पडली महागात! घोड्यावर उभ राहून नाचताना नवरीचा घसरला पाय अन् दोघेही... भर वरातीत झाली फजिती; VIDEO तुफान VIRAL

अशामध्ये एक व्यक्ती येऊन त्या तरुणीसोबत डान्स करु लागतो. आपल्या नवऱ्याला तरुणीसोबत डान्स करताना पाहून त्याची बायको संतप्त होते. ती गर्दीचा विचार न करता सर्वांसमोच आपल्या नवऱ्याला मारायला सुरुवात करते. ही महिला आपल्या नवऱ्याची धुलाई करत त्याला गर्दीतून बाहेर घेऊन जाते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्स या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'ती व्यक्ती जिवंत आहे का?'

दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, 'त्याच्या बायकोला आपल्या नवऱ्याला राजा सोलोमन बनताना पाहायचे नाही.' तर आणखी एका यूजरने लिहिले की, 'आता त्याच्यासाठी जगणे खूप कठीण आहे.' या व्हिडिओसोबत त्याच्यावरील मजेशीर कमेंट्स वाचून सर्वजण पोट धरुन हसत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com