dubai sugar tax  Saam tv
देश विदेश

दुबईमध्ये ‘शुगर टॅक्स’ लागू होणार; कोणत्या पदार्थांवर लागणार शुगर टॅक्स? VIDEO

dubai sugar tax : नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच दुबईत अनेक मोठे बदल अंमलात येणार आहेत. नवीन वर्षात दुबईत शुगर टॅक्स लागू केला जाणार आहे. काय आहे हा शुगर टॅक्स आणि कोणत्या पदार्थांवर तो लावण्यात येईल. पाहूयात हा रिपोर्ट

Vishal Gangurde

गोड खायला कुणाला आवडत नाही. आपल्याकडे सणावर असेल किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी हमाखास गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. मात्र दुबईमध्ये तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर खिशाला चाट द्यावी लागेल. हे आम्ही अशासाठी म्हणतोय कारण दुबईत लवकरच शुगर टॅक्स लागू केला जाणारंय. यूएई सरकारनं 2026 साठीचा अर्थसंकल्प मंजूर करतानाच हा नवा कर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

खलीज टाइम्सच्या अहवालानुसार, यूएईमध्ये 1 जानेवारी 2026 पासून साखरयुक्त पेयांवर लागणारी करपद्धत बदलली जाणारय.आतापर्यंत या पेयांवर 50 % एक्साइज ड्युटी एकसमान आकारली जात होती. मात्र, आता हा कर उत्पादनाच्या श्रेणीऐवजी त्यातील साखरेच्या प्रमाणावर आधारित असेल.

ज्या पेयांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असेल, त्यांच्यावर 50% उत्पादन शुल्क आकारलं जाईल. ज्या पेयात साखर जितकी जास्त असेल तितक अधिक कर द्यावा लागेल. कमी साखर असलेल्या पेयांवर तुलनेनं कमी कर लागणारय. नैसर्गिक साखर असलेल्या काही पेयांना सवलत मिळू शकते.

दुबईमध्ये तुम्हाला बकलावा, कुनाफा, लुकैमत, खजूर चॉकलेट, नाफेह विविध प्रकारचे मध असे अनेक अरबी आणि स्थानिक गोड पदार्थ मिळतील, जे पारंपरिक मिठाईच्या दुकानांपासून ते आधुनिक मॉल्समध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय दुबई चॉकलेट्सही प्रसिद्ध आहेत. मात्र नव्या वर्षात या पदार्थांचा गोडवा चाखायचा असेल तर वाढलेल्या किंमतींचा कडू अनुभव मात्र प्रत्येकाला घ्यावाच लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चुकीच्या UPI ID वर पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन नका घेऊ; या स्टेप्स फॉलो करा, मिनिटात पैसे येतील परत

Maharashtra Live News Update: भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला उमेदवारी

Mustard Oil For Skin: त्वचेला लावा मोहरीचे तेल, फक्त १० दिवसांत दिसेल मोठा फरक

Raigad Tourism : साहसप्रेमींसाठी आव्हानात्मक ट्रेकचा अनुभव, रायगडजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा

Chanakya Niti : नातेवाईकांना या ४ गोष्टी सांगूच नका, अन्यथा नाव खराब झालंच, वाचा चाणक्य काय सांगतात

SCROLL FOR NEXT