Plane Crash In Dubai Saam Tv
देश विदेश

Plane Crash: उड्डाण घेताच विमान कोसळलं, दुबईत एअर शोदरम्यानची घटना; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Plane Crash In Dubai: दुबईत एअर शोदरम्यान मोठी दुर्घटना झाली. उड्डाण घेताच विमान कोसळलं. लढाऊ विमान तेजस कोसळल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

Priya More

Summary:

  • दुबईत विमान कोसळलं

  • उड्डाण घेताच विमान कोसळलं अन् आग लागली

  • लढाऊ विमान तेजल कोसळून मोठी दुर्घटना

  • दुबईत एअर शोदरम्यानची घटना

दुबईमध्ये मोठा विमान अपघात झाला. उड्डाणावेळी लढाऊ विमान तेजस कोसळलं. दुबई एअर शोदरम्यान ही मोठी दुर्घटना घडली. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली. या अपघाताचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबई एअर शोमध्ये सहभागी झालेले भारतीय लढाऊ विमान तेजस कोसळलं. शुक्रवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी ही घटना घडली. दुबई वर्ल्ड सेंट्रल एअर पोर्टजवळ एअर शो सुरू होता. यावेळी उड्डाण घेताच लढाऊ विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर भीषण आग लागली आणि धुराचे लोट परिसरात पसरले.

एअर शो पाहणाऱ्यांनी या विमान अपघाताची घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली. याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. उड्डाण घेतल्यानंतर विमान जमिनीवर जोरात आदळले आणि आगीचा गोळा बनले. या अपघातामध्ये विमानातील पायलटला बाहेर पडण्यात यश आले की नाही? यामध्ये जखमी किंवा कुणाचा मृत्यूबाबतच काहीच माहिती अद्याप समोर आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऐतिहासिक! दोंडाईचामध्ये भाजपच्या २६ नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध विजय

Factory Blast : 'मृत्यूची फॅक्टरी'! बॉयलरच्या स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

Bhakari Tips: भाकरी तासाभरातच कडक होते? वाचा सोप्या टिप्स, मऊ आणि लुसलुशीत राहतील भाकऱ्या

Plane Crash: तेजस लढाऊ विमान कोसळून पायलटचा मृत्यू; उड्डाणापासून क्रॅशपर्यंतच्या घटनेचा थरारक VIDEO

'माझ्याकडे सुप्तशक्ती..' भोंदूबाबानं विवाहितेला पळवून नेलं, दरबारात सापडली कंडोमची पाकिटं अन्..

SCROLL FOR NEXT