Air India Plane Accident Saam Tv
देश विदेश

Plane Accident: नवऱ्याला वाढदिवशी द्यायचं होतं सरप्राईज, आधीचं तिकीट कॅन्सल करून १२ जूनची बुकिंग; विमान अपघातात हरप्रीतचा करुण अंत

Air India Plane Accident: अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये हरप्रीत कौरचा दुर्दैवी मृत्यू झाला. हरप्रीत नवऱ्याला त्याच्या वाढदिवसाचे सरप्राईज देण्यासाठी लंडनला निघाली होती. पण त्यापूर्वीच तिचा अपघातामध्ये मृत्यू झाला.

Priya More

अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये हरप्रीत कोर होरा या महिलेचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. हरप्रीत आपल्या नवऱ्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी लंडनला निघाली होती. पण लंडनला पोहचण्याआधीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. हरप्रीतच्या नवऱ्याचा १६ जूनला वाढदिवस होता. हरप्रीतने लंडनला जाण्यासाठी १९ जूनचे तिकीट बुक केले होते. पण नवऱ्याचा वाढदिवस असल्यामुळे तिने हे तिकीट कॅन्सल करून १२ जूनचे तिकीट काढले.

नवऱ्याला वाढदिवसाचे सरप्राइज देऊन त्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा प्लान हरप्रीतने केला होता. त्यासाठी तिने १९ जूनचे तिकीट कॅन्सल करून १२ जूनचे तिकीट घेतलं. ती अहमदाबादवरून लंडनला जाण्यासाठी निघाली खरी पण ती बसलेल्या विमानाने टेकऑफ केले.अवघ्या काही सेकंदात हे विमान कोसळलं आणि या भीषण अपघातामध्ये हरप्रीतचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हरप्रीत बंगळुरू येथील एका आयटी कंपनीमध्ये नोकरी करत होती. बंगळुरूमधून विमानाने लंडनला जाण्याऐवजी तिने अहमदाबादवरून लंडनला जाण्याचा पर्याय निवडला. तिला हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या वडिलांसोबत काही वेळ घालवायचा होता त्यामुळे ती अहमदाबाद येथे आली. अहमदाबादमध्ये तिचे माहेर होते. वडिलांसोबत काही दिवस राहिल्यानंतर लंडनला नवऱ्याला भेटायला जाईल असा प्लान तिने केला होता.

हरप्रीतचे सासरे हरजीत सिंह होरा यांनी सांगितले की, हरप्रीतने १६ जूनला माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्लानिंग केली होती. ती माझ्या मुलाला भेटायला नेहमी लंडनला जायची. पण यावेळी ही भयंकर घटना घडली आणि ती कायमची आम्हाला सोडून गेली. हरप्रीत विमानात बसण्यापूर्वी तिच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आला होता की, हरप्रीत बेटा हॅप्पी जर्नी. संपूर्ण कुटुंब खूश होते पण या दुर्घटनेमुळे सगळ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे हरप्रीतचे संपूर्ण कुटुंब तुटले आणि सर्वांना हादरला बसला.

दरम्यान, २०२० मध्ये हरप्रीतचे लग्न झाले होते. तिचा नवरा कामानिमित्त लंडनमध्ये राहत होता तर हरप्रीत कामासाठी बंगळुरूत राहत होती. लग्नानंतर हरप्रीत तिच्या नवऱ्यासोबत एक वर्षे ३ महिने राहिली. पण नंतर ती भारतात परत आली. 'हरप्रीत आता पुन्हा लंडनला जाण्याचा प्लान करत होती. तिने अनेक स्वप्न पाहिली होती. दोघेही सोबत राहण्यासाठी प्रयत्न करत होते पण त्यापूर्वीच ही दु:खद घटना घडली.', असे हरप्रीतच्या काकांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT