NDA's Presidential candidate Draupadi Murmu files her nomination in the presence of PM Modi.  saam tv
देश विदेश

President Election : राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मूंचा अर्ज दाखल

द्रौपदी मुर्मू यांच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्चपदी आदिवासी समाजातून आलेल्या महिलेस विराजमान होण्याची ही पहिली घटना ठरण्याची शक्यता आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या (Presidental Candidate Draupadi Murmu) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र माेदी (PM Narendra Modi) आणि एनडीएतील (NDA) मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यापुर्वी मुर्मू यांनी झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून कामकाज काम पाहिले हाेते. (Draupadi Murmu Latest Marathi News)

द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी (president election) अर्ज दाखल करताना पंतप्रधान मोदींसह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित हाेते. दाेन ते तीन दिवसांपुर्वी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मुर्मू यांचे नाव निश्चित झाले हाेते.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्याबाबतची घाेषणा त्यांनी नुकतीच केली आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज भरताना ते उपस्थित राहू शकत नाहीत असेही त्यांनी म्हटले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Diwali 2025 Shani Vakri: दिवाळीला बऱ्याच वर्षांनी होणार शनी वक्री; 'या' राशींना मिळणार शनीचा आशिर्वाद

Shaniwarwada Namaz Row: नमाजपठणवरुन महायुतीत जुंपली; मेधाताईंना अटक करण्याची ठोंबरेंची मागणी

SCROLL FOR NEXT