Donald Trump Saam Tv
देश विदेश

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलॉन मस्क यांनी सोडली साथ

Donald Trump And Elon Musk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एकाच वेळी दोन मोठे धक्के बसले आहेत. टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द करण्यात आले. तर एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली.

Priya More

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोन मोठे झटके बसले आहेत. जगभरातील देशांना व्यापारासाठी धोका निर्माण करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणालाला अमेरिकेच्या फेडरल कोर्टाकडून बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनापासून स्वत:ला दूर ठेवण्याची घोषणा केली. त्यांनी बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करत ही घोषणा केली. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना एकाच वेळी दोन हादरले बसले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिला. कोर्टाने अमेरिकेच्या 'लिबरेशन डे टॅरिफ'वर बंदी घातली. टॅरिफमध्ये सर्व देशांवर १० टक्के टॅरिफ आणि काही देशांवर १० टक्क्यापेक्षा जास्त टॅरिफ लावला होता. ट्रम्प यांनी IEEPA चा वापर करून टॅरिफ लादणे बेकायदेशीर आहे. 'या कायद्यामध्ये अशा टॅरिफला परवानगी नाही. तूट असामान्य- असाधारण धोका म्हणून ग्राह्य धरली जाऊ शकत नाही.', असे कोर्टाने सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र मानले जाणारे टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी ट्रम्प प्रशासनापासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. त्यांनी संघीय नोकरशाही कमी करण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण आता ते डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची सरकारी जबाबदारी सोडत आहेत. ट्रम्प आणि मस्क यांची मैत्री अखेर तुटली. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. आता एलन मस्क यांनी आपला निर्णय जाहीर केला.

डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची जोडी अखेर तुटली. एलन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन सरकारच्या कार्यक्षमता विभागाच्या म्हणजे DOGE चा एलन मस्क यांनी राजीनामा दिला. ट्रम्प सरकारने आणलेल्या 'वन बिग ब्युटीफुल बिल'मुळे एलन मस्क नाराज होते. त्यामुळेच ट्रम्प यांचे विशेष सल्लागार म्हणून काम करणाऱ्या मस्क यांनी ते पद सोडण्याची घोषणा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॉक्रोच जनता पार्टीच्या २ मागण्या सरकारकडून मान्य

शेतकर्‍यांसाठी सर्वात मोठा निर्णय! ७/१२ उतार्‍याबाबतचा 'हा' कडक नियम बदलला; आता कायमचा त्रास मिटला

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीचा उपवास बनवा हेल्दी; 'हे' ७ पदार्थ देतील दिवसभर ताकद आणि एनर्जी

पावसाळ्यात चमचमीत खायची इच्छा झाली? बनवा तोंडाला पाणी आणणारी गावरान राजगिरा भाजी; पाहा सोपी रेसिपी

CJP Protest: मोठी बातमी! सीजेपीच्या ३ पैकी २ मागण्या मान्य, धर्मेंद्र प्रधान उद्या राजीनामा देणार?

SCROLL FOR NEXT