
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीला दम भरल्यानंतर आता सॅमसंग कंपनीला धमकी दिलीय. या कंपनीने भारतात स्मार्टफोन बनवला तर त्यांनाही २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) आकारला जाईल असा दम डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय. जर या कंपन्यांनी त्यांचे स्मार्टफोन अमेरिकेत बनवले नाहीत तर त्यांना आयात शुल्क (टॅरिफ) ला सामोरे जावे लागेल. ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी अॅपल आणि सॅमसंग कंपनीला गंभीर इशारा दिला.
“ आयात शुल्क हे फक्त अॅपलपुरते मर्यादित नाही. हे सॅमसंग आणि अमेरिकेत फोन विकणाऱ्या इतर कोणत्याही कंपनीला लागू होईल. जर त्या कंपन्यांनी अमेरिकेत कारखाना उभारला तर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु जर तुम्ही अमेरिकेत कारखाना उभारला नाही तर २५% कर भरावा लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी या कंपन्यांना दिलाय.
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटलं की, "मी आधीच अॅपलचे सीईओ टीम कुकला सांगितलं की अमेरिकेत विकले जाणारे आयफोन अमेरिकेत बनवले पाहिजेत. भारतात किंवा इतर कोणत्याही देशात नाही. जर असे झाले नाही तर अॅपलला अमेरिकेत किमान २५% कर भरावा लागेल., अस ट्र्म्प म्हणालेत.
अॅपल सध्या त्यांचे आयफोन उत्पादन चीनमधून भारतात हलवत आहे. नुकतेच एका अहवालात असं सांगण्यात आलं होतं की, अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बहुतेक आयफोनचा 'उत्पत्ती देश' आता चीन नसून भारत असेल. अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे एक धोरणात्मक पाऊल होतं. सॅमसंगची परिस्थिती थोडी वेगळी आहे.
कंपनीने २०१९ मध्ये चीनमधील शेवटचा फोन उत्पादन प्रकल्प बंद केला. सध्या, सॅमसंग स्मार्टफोन भारत, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि ब्राझीलमध्ये तयार करत आहे. सॅमसंग चीनवर अवलंबून नाही, तरीही ट्रम्प यांच्या मते, केवळ अमेरिकेत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाच या शुल्कातून सूट मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.