Elon Musk: एक्स युझर्सला मोठा धक्का; Elon Musk च्या कंपनीने वाढवली प्रीमियमची फी

X Subscription Price Increased: X ने आता प्रीमियम प्लानच्या किमती वाढवल्या आहेत. या नवीन किमती 21 डिसेंबर 2024 पासून लागू झाल्यात. या आधीच प्रीमियम योजना घेतली आहे त्यांना पुढच्या वेळी बिल येईल.
Elon Musk
Elon Musk On X Subscriptions Google
Published On

एलन मस्क यांच्या एक्स कंपनीने आपल्या प्रीमियम प्लान्सच्या किमती वाढवल्या आहेत. भारतातील एक्स युझर्स मोठा धक्का देत कंपनीने आपल्या प्रीमियम प्लान्समध्ये थेट ३५ टक्क्यांची वाढ केलीय. हे नवीन दर २१ डिसेंबरपासून लागू झाले आहेत. ज्या लोकांनी प्लान घेतलाय, त्यांना पुढील महिन्यात येणाऱ्या बिलात नवीन दरानुसार पैसे द्यावे लागणार आहे. चला तर जाणून घेऊ भारतीय युझर्सला आता किती रुपये द्यावे लागतील.

आता X Premium+ युझर्सला दरमहा रु. १,७५० भरावे लागतील, याआधी त्यांना रु. १,३०० द्यावे लागतील. त्याचप्रमाणे वार्षिक प्रीमियम+ ची किंमत देखील १३,६०० रुपयांवरून १८,३०० रुपये करण्यात आलीय. एलन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सब्स्कक्रिप्शनचे दर वाढवण्याचे तीन कारणं सांगितली आहेत. यातील पहिलं कारण आहे, आता या प्लॅटफॉर्मवर कोणतीच जाहिरात जाणार नाही.

Elon Musk
Enterpreneurs: जगातील सर्वात शक्तीशाली उद्योगपती कोणते? वाचा टॉप १० मध्ये कोण कोण?

दुसरं कारण म्हणजे, यात कंटेंट बनवणाऱ्या लोकांना अधिक पैसा दिला जाईल. तिसरं कारण आहे, या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. प्रीमियम+ सब्सक्रिबरला अनेक फायदे मिळणार आहेत. त्यांना @Premium कडून मोठी मदत मिळेल. तसेच नवीन फीचर्स 'Radar'चा वापर करणारे एक्सवरील एआय मॉडल्सचा जास्त वापर करू शकतील.

Elon Musk
Fortuner पेक्षाही स्वस्त असेल टेस्लाची Robotaxi, फीचर्स जाणून थक्क व्हाल; ड्रायव्हरलेस कारची किंमत किती?

प्रीमियम पल्सला अधिक चांगलं बनवू शकू. तसेच चांगले फीचर्सचा फायदा मिळावा, यासाठी दर वाढवण्यात आल्याचं कंपनीने सांगितलंय. जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेता तेव्हा त्या पैशाचा थेट फायदा आमचं कंटेंट क्रिएटर्सला होतो. आम्ही पैसे वाटण्याची पद्धत बदललीय. आता आपण फक्त जाहिराती किती वेळा पाहिल्या आहेत हे पाहणार नाही, तर लोकांना तो मजकूर किती आवडतो आणि ते त्याच्याशी किती जोडले जात आहेत हे देखील पाहिलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com