आजचा जमाना हा ऑनलाईनचा जमाना आहे. इथं खाद्यपदार्थांपासून अगदी टीव्ही, फ्रीज मोबाईलपर्यंत सारं काही ऑनलाईन मागवता येतं. त्यासाठी कंपन्यांमध्येही जोरदार स्पर्धा सुरू आहे. पण अमेरिकेनं मात्र याबाबतीत एक पाऊल पुढे टाकलंय. इथली प्रमुख फूड डिलिव्हरी कंपनी डोरडॅशनं आपला नवीन ऑटोनॉमस डिलिव्हरी रोबो सादर केला आहे. ज्याचं नाव आहे डॉट...हा डॉट साधासुधा नाही तर तो आहे स्मार्ट रोबो...तुम्ही फक्त खाद्यपदार्थाची ऑर्डर करायची की अवघ्या काही मिनिटांमध्ये तो तुम्हाला तुमचं जेवण घरपोच किंवा तुम्ही दिलेल्या पत्यावर आणून देतो. ऑटोनॉमस व्हेईकल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात
डॉट हा डोरडॅशचा पहिला स्वतंत्र प्रयत्न आहे. यापूर्वी कंपनीनं ड्रोन डिलिव्हरीची चाचणी केली होती. डोरडॅशचे सह-संस्थापक स्टॅनली यांनी फूड डिलिव्हरी व्यवसायातली गुंतागुंत आणि व्याप्ती लक्षात घेऊन नव्या तंत्रज्ञानावर भर दिलाय. या सगळ्यावर ‘डॉट’ रोबो उत्कृष्ट पर्याय असल्याचं त्यांनी म्हंटलंय.
या रोबोचा वेग ताशी 32 किमी इतका आहे. तो एकावेळी 6 पिझ्झा बॉक्स किंवा 14 किलो पर्यंतचे सामान नेऊ शकतो. यामध्ये 8 कॅमेरे आणि 3 सेन्सर बसवलेले आहेत. यामध्ये इंटर्नल कॅमेरे आहेत, जे अन्न सुरक्षित आणि योग्य स्थितीत पोहोचेल याची खात्री करतात. यामधील ‘स्मार्ट स्केल’ हे फीचर ऑर्डरचं वजन करतं आणि काही कमतरता असल्यास त्वरित ओळखतं.
सध्या अमेरिकेतल्या फीनिक्स शहरात या रोबोची चाचणी सुरू आहे. भविष्यात इतर प्रमुख महानगरांमध्येही रोबोद्वारे डिलिव्हरी केली जाईल असं कंपनीने सांगितलंय. याशिवाय येत्या काळात ड्रोन डिलिव्हरीचाही समावेश असणार आहे. या रोबोतल्या स्मार्ट स्केल फीचरमुळे ऑर्डरमध्ये वस्तू कमी असल्याच्या तक्रारी 30% पर्यंत कमी झाल्या आहेत. महत्वाचं म्हणजे उबर आणि इतर कंपन्या देखील ड्रोन आणि सेल्फ-ड्रायव्हिंग कारद्वारे डिलिव्हरी सेवांमध्ये गुंतवणूक करतायेत. यातून, भविष्यात फूड डिलिव्हरीमध्ये सुलभता येणारंय. त्यामुळे येत्या काही वर्षात तुमच्या दारात तुमची ऑर्डर घेऊन रोबो आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.