Donald Trump News : राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देत डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी १२ देशांच्या नागरिकांच्या देशातील प्रवेशबंदीच्या घोषणेवर सही केली. डोनाल्ड ट्रम् यांनी सात देशाच्या नागरिकांवर तात्पुरत्या स्वरूपाची प्रवेश बंदी घातली आहे. यामध्ये भारताचा शेजारी असलेल्या अफगाणिस्तानचाही समावेश आहे.
कोणत्या देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी -
अफगाणिस्तान, म्यांमार, चाड, कांगो गणराज्य, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सूडान आणि येमेन यांचा समावेश आहे. याशिवाय, बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात देशांच्या नागरिकांवर आंशिक प्रवेश निर्बंध लादण्यात आले आहेत. व्हाइट हाउसच्या मते, हे निर्बंध स्थलांतरित आणि गैर-स्थलांतरित अशा दोन्ही प्रकारच्या प्रवेशावर लागू होतील.
भारताच्या शेजारी देशावर बंदी का?
अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबा आहे. तो एक दहशतवादी गट आहे. तेथे पासपोर्ट किंवा नागरी दस्तऐवज जारी करण्यासाठी सक्षम किंवा सहकार्य करणारे केंद्रीय प्राधिकरण नाही. तसेच योग्य तपासणी यंत्रणा देखील नाही. म्यानमारच्या नागरिकांवरील बंदीचा निर्णय ओव्हरस्टे अहवालाच्या आधारे घेण्यात आला आहे.
ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळातच परदेशी नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध घातले होते. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांना रोखण्यात यश मिळाले होते. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती, असे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले.
व्हिसा प्रक्रियेदरम्यान अमेरिकेने सतर्क राहणे आवश्यक आहे. देशात प्रवेश मंजूर केलेल्या व्यक्तींचा अमेरिकन नागरिकांना किंवा राष्ट्रीय हितांना हानी पोहोचवण्याचा हेतू नसेल. तसेच, प्रवेश मिळालेल्या व्यक्तींनी आणि आधीपासून अमेरिकेत असलेल्या व्यक्तींनी अमेरिकन नागरिक, संस्कृती, सरकार, संस्था किंवा स्थापना सिद्धांतांविरुद्ध शत्रुत्वपूर्ण दृष्टिकोन ठेवू नये, तसेच नामांकित परदेशी दहशतवाद्यांचे किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या इतर घटकांचे समर्थन, सहायता किंवा प्रचार करू नये, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.