शेतमजूर बापाकडे BMW मागितली, गरीब बिचाऱ्याने स्विफ्ट डिझायर घेऊन दिली; हट्टी पोराने आयुष्य संपवलं

BMW car suicide case : शेतमजूर वडिलांकडे बीएमडब्ल्यू गाडीची मागणी करत २१ वर्षीय तरुणाने सिद्दीपेटमध्ये आत्महत्या केली. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही हट्ट धरण्यामुळे घडली शोकांतिका.
21-Year-Old Dies by Suicide After BMW Car Demand Denied
21-Year-Old Dies by Suicide After BMW Car Demand Deniedsaam TV News
Published On

21-Year-Old Dies by Suicide After BMW Car Demand Denied : आपली आर्थिक स्थिती पाहूनच हाय पाय पसरायला हवेत. पण कधीकधी परिस्थितीकडे कानाडोळा करून अनेक निर्णय घेतले जातात, त्यानंतर मोठी संकटे ओढावतात. असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. २१ वर्षीय मुलाने शेत मजूर बापाकडे BMW गाडी आणि अलिशान घर हवं, असा हट्ट धरला होता. पण परिस्थिती बेताची असल्यामुळे बापाने असमर्थता दर्शवली. त्यामुळे संतापलेल्या मुलाने आत्महत्या केली. तेलंगणामधील सिद्दीपेटमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. या घटनेनंतर सिद्दीपेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २१ वर्षीय तरुण दहावीपर्यंत शिकला होता. पण तो बेरोजगार होता आणि दारूच्या आहारी गेला होता. तो पालकांना शेतीच्या कामात मदत करत होता. त्याच्या कुटुंबाकडे दोन एकर शेती आहे. २१ वर्षीय मुलाला अलिशान घर आणि BMW गाडी हवी होती. गेल्या काही काळापासून तो यासाठी आई-बापांवर दबाव टाकत होता. पण आर्थिक अडचणीत असणाऱ्या बापाला मुलाचा हट्ट पुरवणं शक्य झालं नाही. मुलाने टोकाचे पाऊल उचलले.

21-Year-Old Dies by Suicide After BMW Car Demand Denied
Jalna Tragedy: दर्शनासाठी गेले पण परतलेच नाहीत, एकाच घरातील ३ चिमुकल्यांचा मृत्यू, जालन्यात हळहळ

२१ वर्षीय मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, BMW न मिळाल्यास मुलाने आत्महत्येची धमकी दिली होती. आर्थिक अडचणींमुळे Maruti Swift Dzire घेऊ असं त्याला सांगतिलं होतं. शुक्रवारी दुपारी सिद्दीपेटमधील एका कार शोरूमला भेट दिली. पण Swift Dzire च्या निर्णयामुळे तो निराश झाला होता. दुपारी ३:३० च्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने आपल्या वडिलांना याबाबत कळवले. वडील आणि मोठ्या भावाने त्याला मोटरसायकलवरून सरकारी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला RVM रुग्णालयात हलवण्यात आले, पण शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

21-Year-Old Dies by Suicide After BMW Car Demand Denied
Ajit Pawar : शरद पवारांना अजित पवारांचा मोठा हादरा, निष्ठावंत शिलेदार घड्याळ बांधणार

पोलिसांनी याप्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पण या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. शेतकरी मजूर असलेल्या वडिलांना BMW घेणं शक्य नसल्याचे माहिती असतानाही हट्ट का केला? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

21-Year-Old Dies by Suicide After BMW Car Demand Denied
Akola Crime: प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट तरुणीची हत्या, ज्याच्यासाठी दिल्लीहून अकोल्यात आली, त्यानेच काटा काढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com