भयंकर! छिंदवाड्यात ब्रेक फेल झाल्याने डीजे वाहन गर्दीत घुसले, चेंगराचेंगरीचा VIDEO व्हायरल Saam Tv
देश विदेश

भयंकर! छिंदवाड्यात ब्रेक फेल झाल्याने डीजे वाहन गर्दीत घुसले, चेंगराचेंगरीचा VIDEO व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच एक डीजे ट्रक थेट भाविकांच्या गर्दीमध्ये घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रेक फेल झाल्याने डीजे ट्रक समोर असणाऱ्या भाविकांना चिरडत पुढे गेला आहे. या दुर्घटनेमध्ये १३ भाविक जखमी झाले असून ३ जणांची प्रकृती ही अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

सर्व जखमींना सौसर रुग्णालयामध्ये (hospital) दाखल करण्यात आले आहे. तेथून त्यांना उपचाराकरिता दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याची माहिती मिळली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ (Video) देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंभीर जखमींपैकी १ भाविक महाराष्ट्रातील (Maharashtra) रहिवासी आहे. पवन हेमराज भोंगर (जामगाव, महाराष्ट्र), जय नंदू तुमराम (नंदनवाडी पांडूर्णा) आणि करण अंतराम सलामे (पांडूर्णा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दुर्घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी डीजेची (DJ) तोडफोड करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

सर्व भाविक जाम सावलीतील हनुमान मंदिरात (temple) पदयात्रा करत चाले होते. भाविकांच्या पाठीमागे डीजे लावलेला मिनी ट्रक जात होता. मात्र ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक अनियंत्रित झाला आणि भाविकांच्या गर्दीमध्ये घुसला आहे. ट्रकच्या पुढे भक्तिगीतांच्या तालावर नाचण्यात मग्न असलेले भाविक ट्रकखाली चिरडले गेले आहेत. जखमींना तात्काळ सौसर (Sauser) येथील रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे.

मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे रेफर केले आहे. या दुर्घटनेमध्ये ३ भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अचानक झालेल्या या घटनेने भाविकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. जीव वाचवण्याकरिता भाविक इकडे तिकडे पळू लागल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. एसडीओपी एसपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे.

सर्व भाविक जाम सावली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरामध्ये दर्शनाकरिता चाले होते. हनुमान दर्शनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पदयात्रा पांढुर्णा येथून जाम सावली येथे आली होती. पांढुर्णातील हजारो भाविक या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. अचानक यात्रेत डीजे ठेवलेल्या मिनी ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि ट्रक यात्रेत घुसला. ट्रकच्या छतावरही काही भाविक बसले होते.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT