uttar pradesh shocking  Saam tv
देश विदेश

लग्नाच्या वरातीत डीजेसमोर नाचताना विपरीत घडलं; अचानक एकाने ३ गोळ्या झाडल्या, एकाचा मृत्यू

uttar pradesh shocking : लग्नाच्या वरातीत डीजे ऑपरेटवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

गोरखपूरमध्ये लग्नाच्या वरातीत गोळीबार

१८ वर्षीय डीजे ऑपरेटरचा जागीच मृत्यू

बाबा बालेश्वर नाथ मंदिराजवळील मॅरेज हॉलसमोर घडली घटना

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका लग्नाच्या वरातीत मोठा राडा झाला आहे. या वरातीत डीजे ऑपरेटरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने घटनेला दुजोरा दिला आहे. गोरखपूर गगहा भागातील बाबा बालेश्वर नाथ मंदिराजवळील गुरू कृपा मॅरेज हॉलजवळ ही घटना घडली आहे.

बालेश्वर नाथ मंदिराजवळ हत्या करणाऱ्या व्यक्ती ओळख पटलेली आहे. छोटू असे १८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. छोटू हा गौशाळा गावाजवळ राहत होता. नवरदेवाची वरात लग्नाच्या हॉलच्या दिशेने पुढे पुढे सरकत होती. या वरातीत डीजे लावण्यात आला होता. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शीने हा संपूर्ण थरार सांगितला. हॉलच्या दिशने वरात जाताना ही दुर्घटना घडली आहे.

प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, 'वऱ्हाडी मंडळी डीजेच्या तालावर नाचत होती. एका अज्ञात तरुणाने हवेत गोळीबार केला त्याने एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्याने दोन गोळ्या हवेत झाडल्या. तिसरी गोळी थेट छोटूच्या डोक्यात झाडली. या गोळीबारात छोटूचा जागीच मृत्यू झाला'.

गोळीबारानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी छोटूला मृत घोषित केले. या घटनेनंतर वरात पुढे गेली. हॉलमध्ये लग्नाचा विधी पूर्ण करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यासाठी आला. पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधिकारी दिनेशी पुरी यांनी गोळीबारात डीजे ऑपरेटर छोटूचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Causes Of Pimples: चेहऱ्यावर सतत पिंपल्स का येतात? कसे कमी होतील नको असलेले पिंपल्स

Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमान अपघाताचा आणखी एक VIDEO समोर, दृश्य पाहून थरकाप उडेल

Talegaon Tourism: तळेगावपासून 131 किमी दूर आहे हे सुंदर हिल स्टेशन, या विकेंडला करा मग प्लान

Viral Video : कुणी तरी येणार गं! गरोदर मैत्रिणीसाठी लोकलमध्ये ठेवलं डोहाळे जेवण, Video पाहून म्हणाल...

Maharashtra Live News Update : पालघरच्या एमआयडीसीमध्ये कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT