मुंब्र्यामध्ये फेरीवाल्यांकडून सहाय्यक आयुक्तांना घेराव; पोलीस मदतीला धावले, नेमकं काय घडलं?

mumbra hawkers : मुंब्र्यामध्ये फेरीवाल्यांकडून सहाय्यक आयुक्तांना घेराव घातल्याची घटना घडली. त्यावेळी सहाय्यक आयुक्तांच्या मदतीला पोलीस पोहोचले.
mumbra hawkers news
mumbra hawkers Saam tv
Published On

मुंब्र्यात फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी वाढली

वाहतूक कोंडीची समस्या, नागरिक त्रस्त

महापालिकेच्या कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांचा घेराव

मुंब्र्यामध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फेरीवाल्यांमुळे फूटपाथवर चालण्यासाठी देखील जागा नसते. या फेरीवाल्यांमुळे रस्यावर प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे याच फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त घटनास्थळी पोहोचले. परंतु फेरीवाल्यांनी सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला.

mumbra hawkers news
रेल्वे प्रवाशांचा शनिवारी-रविवारी खोळंबा होणार; महत्वाच्या कामासाठी पॉवरब्लॉकची घोषणा, कसं असेल लोकलचं वेळापत्रक?

नेमकं काय घडलं?

मुंब्रा येथे आज ठाणे महानगरपालिकेच्या कारवाईदरम्यान मुंब्रा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त विजय कावडे यांना रस्त्यावरील फेरीवाल्यांनी (हॉकर्स) घेराव घातला. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की, पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तणावजन्य परिस्थितीतून साहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांच्या विळख्यातून बाहेर काढून सुरक्षितपणे गाडीत बसवून तिथून रवाना केले.

mumbra hawkers news
पुण्यात दिवसाला 10 घटस्फोट; हजारो पुणेकर का घेतायत काडीमोड? VIDEO

आगामी रमजान महिन्यात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि मुंब्रा पोलीस आज संयुक्तपणे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरले होते. कारवाई सुरू होताच फेरीवाल्यांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला.

फेरीवाल्यांनी सहाय्यक आयुक्त विजय कावडे यांना कारवाईबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. फेरीवाल्यांच्या जमावाने साहाय्यक आयुक्तांना घेरले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि कावडे यांना गर्दीतून बाहेर काढून तिथून सुरक्षित बाहेर काढले.

mumbra hawkers news
'पप्पी घेणाऱ्या सोन्या'ने केलंय मार्केट जाम; काय आहे कारण?

तत्पूर्वी, इस्लाममध्ये रमजान महिना हा पवित्र मानला जातो. रमजान महिना हा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. या महिन्याच्या पार्श्वभूमीवर शेकडो मुस्लिम बांधव खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसत आहे. त्याचदरम्यान फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले होते. परंतु फेरीवाल्यांनी सहायक आयुक्तांना घेरलं. त्यावेळी पोलिसांनी सहायक आयुक्तांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com