Shreya Maskar
लोणावळा-खंडाळा हे जुळे हिल स्टेशन आहे. निसर्गरम्य दऱ्या, धबधबे आणि प्राचीन लेण्यांसाठी ओळखले जाते. हे ठिकाण मुंबई-पुण्यापासून जवळ आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग बहरतो.
टायगर पॉइंट ज्याला 'टायगर्स लीप' असेही म्हणतात. समुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणाहून पश्चिम घाटाचे विहंगम दृश्य दिसते. दरीत झेप घेणाऱ्या वाघासारखा भास येथे होतो.
भुशी धरण हे इंद्रायणी नदीवर बांधलेले दगडी धरण आहे. पावसाळ्यात खडकाळ पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
पवना तलाव निसर्गरम्य कृत्रिम जलाशय आहे, जो लोणावळ्यापासून सुमारे २०-२५ किमी अंतरावर आहे. हे मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी विकेंड कॅम्पिंग बेस्ट आहे.
राजमाची किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत ऐतिहासिक दुहेरी किल्ला (श्रीवर्धन आणि मनोरंजन) आहे. २,७१० फूट उंचीवर वसलेले हे ठिकाण ट्रेकिंगसाठी लोकप्रिय ठिकाण आहे.
लोणावळ्याजवळ पश्चिम घाटात वसलेली कार्ला आणि भाजा लेणी २,००० वर्षे जुनी आहेत. प्राचीन प्रार्थनागृहे, खांबांवरील नक्षीकाम आणि स्तूप ही या ठिकाणांची वैशिष्ट्ये आहेत.
कुणे धबधबा हा लोणावळा आणि खंडाळा यांच्या दरम्यान सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे. २०० मीटर (६५६ फूट) उंचीवरून कोसळणारा हा धबधबा भारतातील उंच धबधब्यांमध्ये येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.