Pune : वळणावळणाचे घाट अन् उंचावरून कोसळणारे धबधबे, रोड ट्रिप प्रेमींसाठी 'हे' ठिकाण जणू स्वर्गच

Shreya Maskar

पावसाळा

रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. तुम्हाला पावसाळ्यात मित्रांसोबत किंवा जोडीदारासोबत रोड ट्रिप करायची असेल तर ताम्हिणी घाट हे स्वर्गाहून सुंदर लोकेशन आहे.

rainy season | pinterest

पुणे

ताम्हिणी घाट हा सह्याद्रीच्या रांगांमधील मुळशी आणि ताम्हिणी दरम्यानचा एक अद्भुत पर्वतीय मार्ग आहे, जो मुंबईच्या आग्नेयेस 140-160 किमी अंतरावर आहे. पावसाळ्यात येथे धुक्याची चादर आणि सर्वत्र हिरवळ पाहायला मिळते.

Pune | google

ताम्हिणी घाट

हिरव्यागार टेकड्या, धुके असलेले रस्ते आणि उंचावरून धो-धो कोसळणारे धबधबे यांसाठी ताम्हिणी घाट ओळखला जातो. मुंबई आणि पुण्याच्या लोकांसाठी हा जवळचा पावसाळी पिकनिक स्पॉट आहे.

Tamhini Ghat | pinterest

पर्यटन स्थळे

ताम्हिणी घाटाच्या आजूबाजूला फिरण्यासाठी अनेक लोकप्रिय ठिकाणे आहेत. उदा. मुळशी धरण, देवकुंड धबधबा, कोलाड, उलटा धबधबे, नाणेघाट

tourist spots | google

रिव्हर्स वॉटरफॉल

पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे दरीतून वाहणारे पाणी खाली पडण्याऐवजी वाऱ्याच्या दाबाने वरच्या दिशेला उडते,यामुळे पाणी उलट वाहत असल्याचा भास होतो. हा धबधबा पाहायला पर्यटक पावसाळ्यात येथे आवर्जून येतात.

Reverse waterfall | pinterest

कोलाड

कोलाड हे कुंडलिका नदीवरील रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात येथे अनेक धबधबे आणि नयनरम्य हिरवळ पाहायला मिळते. येथे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.

Kolad | google

मुळशी धरण

मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील एक प्रमुख 'ग्रॅव्हिटी डॅम' (गुरुत्वीय धरण) आहे.पावसाळ्यातील विलोभनीय निसर्गदृश्ये येथे पाहायला मिळतात.

Mulshi Dam | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Chhattisgarh | saam tv
येथे क्लिक करा...